
Nagpanchami 2023 Importance: नागपंचमी सणाला (Nag Panchami 2023) हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व आहे. हा सण खूप आनंद घेऊन येतो असे म्हणतात. याच दिवशी भगवान श्रीकृष्ण (Shri Krishna) हे कालिया नागाचा पराभव करुन यमुना नदीच्या पात्रातून सुखरुप बाहेर आले होते. तेव्हापासून नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केली जाते.
नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. त्याचसोबत आजच्या दिवशी प्रत्येक जण आपल्या नातेवाई, जवळचे मित्र-मैत्रीण आणि परिवाला नागपंचमीच्या शुभेच्छा देतात. यावर्षी नागपंचमी सण २१ ऑगस्ट रोजी आहे. यानिमित्ताने तुम्ही देखील आपल्या मित्र-मैत्रीण, नातेवाई, आणि कुटुंबीयांना नागपंचमीच्या खास मराठी भाषेत शुभेच्छा देत हा सण साजरा करु शकता....
१. देवतांचे देवता महादेव,
भगवान विष्णूचे सिंहासन,
ज्याने पृथ्वीला उंच केले,
त्या सर्प देवाला माझा नमस्कार
नाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
२. श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण नागपंचमी!
यमुना नदीच्या पात्रात कालिया नागाचा पराभव करून,
भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस म्हणजे,
श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी!
नागपंचमीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
३. दूध लाह्या वाहू नागोबाला
चल ग सखे वारुळाला
नागोबाला पूजायाला
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
४. समुद्र मंथनाने कळली जगास ज्यांची महती
अशा नागदेवांना सारे जग वंदती
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
५. महादेवाचे लाडके नाग,
तुमची सर्व कामे आनंदात होतील,
जेव्हा तुमची भावना शुद्ध राहील
तुमच्या परिवारास
नाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
६.नागपंचमीच्या दिवशी देवाकडे एकच प्रार्थना,
तुमच्यावर ईश्वराची सदैव कृपा असू दे,
तुमचे आयुष्य आनंदी आणि मंगलदायी होवो,
नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा!
७. रक्षण करा नागाचे,
जतन करा निसर्गाचे;
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
८. नागपंचमीच्या दिवशी,
तुमच्यावर ईश्वराची
सदा कृपा असू दे,
आणि तुमचे आयुष्य
मंगलदायी होवो…
नागपंचमीच्या शुभेच्छा!
९. सण आला नागपंचमीचा
मनापासून शुभेच्छा तुम्हाला
सदैव सुखी, आनंदी राहा
हीच आमची सदिच्छा
नागपंचमीच्या शुभेच्छा!
१०. जपायला हवं नागाच्या अस्तित्वाला
नको केवळ आंधळी पूजा
नाग दूध पित नाही कधीच
देऊ नका त्याला नाहक सजा
नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा!
११. बळीराजाचा हा कैवारी
नागराजाची मुर्ती पुजूया घरी
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
१२. उत्सवांची झुंबड
घेऊन येणाऱ्या श्रावण
महिन्यातील पहिलाच सण
म्हणजे शुद्ध पंचमीला
येणारी नागपंचमी
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
१३. नागपंममीचा सण आला,
पर्जन्यराजाला आनंद झाला,
न्हाहून निघाली वसुधंरा,
घेतला हाती हिरवा शेला,
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
१४. नागपंचमी साजरी करूया..
ईश्वररूपी नागाचे रक्षण करूया…
निसर्गाचे जतन करूया…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
१५. शेतकऱ्याचा मित्र
नागदेवताची पूजा करण्याचा आज दिवस…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.