
Nagpanchami 2023 Importance: नागपंचमी सणाला (Nag Panchami 2023) हिंदू धर्मामध्ये खूप महत्व आहे. यावर्षी नागपंचमीचा सण पाचव्या श्रावणी सोमवारी (Shravani Somvar) आला आहे. उद्या म्हणजेच २१ ऑगस्ट रोजी राज्यभर नागपंचमी सण साजरा केला जाणार आहे.
नागपंचमीच्या दिवशी नाग देवतची पूजा केली जाते. नागदेवतेची पूजा केल्यामुळे घरामध्ये सुख-शातीं नांदते असे म्हटले जाते. यादिवशी उपवास केला जातो आणि महिला वारुळाला जाऊन पुजतात. महत्वाचे म्हणजे अनेक ठिकाणी जिवंत नागाची देखील पूजा केली जाते. बरेच जण नागपंचमीच्या दिवशी घरामध्येच नागाची मूर्ती अथवा प्रतिमेची पूजा करतात.
– ज्यांच्या कुंडलीत राहू-केतू भारी आहेत त्यांनी नागपंचमीच्या दिवशी व्रत ठेवावे.
– नागपंचमीच्या दिवशी नागपंचमी मंत्राचा जप करा.
- नागपंचमीच्या दिवशी गरजूंना दान करणं शुभ मानले जाते.
- नागपंचमीच्या दिवशी अजिबात माती उखरु नये, शेतात नांगर चालवू नये. त्यामुळे सापांना इजा होण्याचा धोका असतो.
- नागपंचमीच्या दिवशी लोखंडी भांड्यांमध्ये अन्न शिजवू नका. त्याचसोबत लोखंडी भांड्यात अन्न खाऊ नका.
- नागपंचमीच्या दिवशी झाडे तोडू नका. यामध्ये लपलेल्या सापांना इजा होऊ शकते.
- नागपंचमीच्या दिवशी शिवणकामाशी संबंधित कोणतेही काम करू नये. म्हणजेच यादिवशी सुईचा वापर करु नये. असे करणे अशुभ मानले जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.