Nag Panchami 2025 : नाग पंचमीच्या तारखेपासून ते पूजेची पद्धत सर्व माहिती घ्या जाणून

Nag Panchami Festival Guide 2025: नागपंचमी सण २९ जुलै २०२५ रोजी साजरा होईल. नागदेवतेची पारंपरिक पूजा, कालसर्प दोष निवारणाचे उपाय, आणि पूजेची संपूर्ण विधी येथे जाणून घ्या.
Nag Panchami Festival Guide 2025
Nag Panchami 2024 Saam TV
Published On
Summary
  1. नागपंचमी सण यंदा २९ जुलै २०२५ रोजी साजरी होणार आहे.

  2. पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ५.४१ ते ८.२३ दरम्यान आहे.

  3. नागदेवतेला दूध, हळद, फुले अर्पण करून मंत्र जप करावा.

  4. नागपंचमी पूजा केल्याने कालसर्प दोषाचा नकारात्मक प्रभाव कमी होतो.

नागपंचमी हा सण महाराष्ट्रात महिला मोठ्या उत्साहाने पार पाडतात. श्रावणात हा सण आल्याने हा सण अत्यंत शुभ मानला जातो. हा सण नागांना समर्पित आहे. यंदा नागपंचमी २८ जुलै२०२५ पासून ते ३० जुलैपर्यंत असणार आहे. नागपंचमी गी शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरी केली जाणार आहे.

नागपंचमी नेमकी कोणत्या तारखेला म्हणजेच २८ की २९ जुलैला साजरी होणार? हे आपण जाणून घेऊयात. तर यंदा नागपंचमी ही पंचांगानुसार २९ जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. नागपंचमीचा शुभ मुहूर्त हा २९ जुलै रोजी सकाळी ०५.४१ ते ०८.२३ पर्यंत असेल. या दिवशी नाग देवतेची पूजा केल्याने कुंडलीत असलेल्या कालसर्प दोषाचा नकारात्मक प्रभाव कमी होतो. तसेच घरात सुख, शांती आणि समृद्धी येते असे म्हटले जाते.

Nag Panchami Festival Guide 2025
Kumbha Rashi : कुंभ राशीसाठी भाग्याचे दार उघडणार? वाचा संपूर्ण भविष्य

नागपंचमीची पूजा कशी करावी?

सकाळी अंघोळ करुन स्वच्छ कपडे परिधान करा. मग नाग देवतेची मूर्ती किंवा चित्र एका लाल कापडावर ठेवा. जर मुर्ती नसेल तर तुम्ही पिठाचा नाग बनवू शकता. आता नाग देवतेला दूध, पाणी, हळद, रोली, तांदूळ, फुले आणि मिठाई अर्पण करा. मग 'ओम नागदेवाय नम:' या मंत्राचा जप करा.

Nag Panchami Festival Guide 2025
UPI New Rules 2025 : UPI वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; हे 3 नियम 1 ऑगस्टपासून लागू
Q

नागपंचमी कधी साजरी केली जाते?

A

यंदा नागपंचमी २९ जुलै २०२५ रोजी साजरी केली जाणार असून पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ५.४१ ते ८.२३ या वेळेत आहे.

Q

नागपंचमीला कशी पूजा केली जाते?

A

नागदेवतेची पूजा दूध, पाणी, हळद, फुले व गोड पदार्थ अर्पण करून ‘ॐ नागदेवाय नमः’ मंत्राचा जप करतात.

Q

नागपंचमी साजरी करण्यामागील धार्मिक कारण काय आहे?

A

नागपंचमीला नाग देवतेची पूजा केल्याने कुंडलीतील कालसर्प दोषाचा प्रभाव कमी होतो, व घरात सुख-शांती प्राप्त होते.

Q

नागपंचमीच्या दिवशी काय टाळावे?

A

नागपंचमीच्या दिवशी जमिनीची खोदकाम, लोखंडी वस्तूंचा वापर आणि वादविवाद टाळावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com