वटपौर्णिमा म्हटल्यावर हिंदू धर्मातील प्रत्येक विवाहीत महिलेचा उपवास असतो. आपल्या पतीच्या दीर्घआयुष्यासाठी पत्नी वटपौर्णिमेचा उपवास करतात. या दिवशी सुंदर साडी नेसून तयार होतात. त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करतात आणि त्याला धागा बांधतात. या दिवशी सर्व विवाहीत मिहला कडक उपवास करतात.
पुजेनंतर पतीच्या हातून गोड पदार्थ खाऊन उपवास सोडतात. दिवसभर उपवास आणि त्यात घरातील सर्व कामे करावी लागतात. त्यामुळे पत्नी पूर्ण थकलेली असते. त्यात जेव्हा रात्रीचाही स्वयंपाक करावा लागतो तेव्हा ताण आणखी वाढतो. त्यामुळे या वटपौर्णिमेला तुमच्या पत्नीला छान बाहेर हॉटेलमध्ये जेवण्यासाठी घेऊन जा. त्यासाठीच आज मुंबईतील प्रसिद्ध व्हेज रेस्टॉरंटची नावे पाहणार आहोत.
ताज हॉटेल
मुंबईमध्ये गेट वे ऑफ इंडीया जवळ असलेलं हॉटेल. सर्वांनीच या हॉटेलचं नाव ऐकलं असेल. या हॉटेलमध्ये एकदा तरी भेट द्यावी असं सर्वांना वाटतं. त्यामुळे या वटपौर्णिमेला तुम्ही ताज हॉटेलला देखील जाऊ शकता.
कॅफे मद्रास
तुमच्या पत्नीला साउथ इंडिअन फूड जास्त आवडत असेल तर तिला माटुंग्याच्या मद्रास कॅफेत घेऊन जा. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी देखील येथे हजेरी लावत येथील डोस्याची चव चाखली आहे त्यामुळे तुम्ही देखील येथे भेट देऊ शकतो.
निसर्ग
बदलापूर तळोजा मार्गावर एक निसर्ग हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये विविध शाकाहारी पदार्थ देखील मिळतात. तुम्ही तुमच्या आवाडीनुसार पत्नीसाठी येथील एक डीश घेऊ शकता.
बॅस्टीन
बँड्रा वेस्ट येथे बॅस्टीन नावाचं हॉटेल आहे. येथे देखील उत्तम आणि चविष्ट पदार्थ मिळतात. नवीन कपससाठी हे ठिकाण बेस्ट आहे. आपल्या पहिल्याच वटपौर्णिमेचं सेलिब्रेशन तुम्ही येथे करू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.