Multibagger Share : अवघ्या दीड रुपयांच्या शेअरमुळे गुंतवणूकदार कोट्याधीश; चार वर्षात 20000 टक्क्याहून अधिक नफा

Authum Investment & Infrastructure शेअरमध्ये 48,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर अनेकजण करोडपती बनले आहे.
Money
MoneySaam TV
Published On

Share Market News : शेअर बाजारात योग्य वेळी योग्य शेअरमध्ये गुंतवणूक केली तर ती फायदेशीर ठरते. काही शेअर तर असे आहेत की ते तुम्हाला कमी गुंतवणुकीत लखपती, करोडपती बनवू शकतात. असाच एक शेअर आहेत, ज्या शेअरमुळे अनेकांना लॉटली लागली आहे.

NBFC ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर (Authum Investment & Infrastructure) कंपनीचे शेअर्समध्ये आज 4.20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील चार वर्षात या कंपनीतील गुंतवणूक अनेकांना फायदेशीर ठरली आहे. अवघ्या 48,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर अनेकजण करोडपती बनले आहे.

Authum Investment & Infrastructure या दीड रुपयांच्या शेअरने चार वर्षांत मोठी झेप घेत 325 रुपयांपर्यंत मजल मारली आहे. आज हा शेअर 4.20 टक्क्यांच्या वाढीसह 334.75 रुपयांवर पोहोचला आहे.

चार वर्षांत किमतीत 20000 टक्क्यांची वाढ

18 मार्च 2019 रोजी ऑटम शेअर्स फक्त 1.55 रुपयांना उपलब्ध होते. आता तो 334 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच अवघ्या चार वर्षांत गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीत 20868 टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदाराने त्यावेळी 48,000 रुपयांच्या गुंतवणूक केली असेल ती गुंतवणूक आज कोट्यवधींमध्ये गेली असेल.

Money
Gold Silver Price : सुवर्णसंधी ! सोन्याच्या दरात ४०० रुपयांनी घसरण; तर चांदीच्या किंमतीही घट, तपासा आजचे दर

मागील वर्षाच्या तुलनेत शेअर किमतीत मोठी वाढ

गेल्या वर्षी 20 जून 2022 रोजी शेअर 134 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होता. यानंतर, एका वर्षापेक्षा कमी कालावधीत, आज 14 जून 2023 रोजी तो 147 टक्क्यांनी वाढून 334 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला.

Money
What Is Green Tax On Vehicles : वाहनांवर लागणारा ग्रीन टॅक्स काय आहे? SMEV ने NGT मध्ये केली याचिका दाखल

कंपनीची सद्यस्थिती

ऑथम सिक्युरिटीज ही NBFC आहे. कंपनी शेअर्स आणि सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करण्याच्या व्यवसायात आहे. कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचे तर मार्च तिमाही त्यांच्यासाठी वाईट होती. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीला 63.29 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता, परंतु पुढच्याच तिमाहीत जानेवारी-मार्च 2023 मध्ये 134.28 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com