Motorola : मोटोरोलाचा Edge 60 Pro फोन भारतात लॉंच, जाणून घ्या किंमत अन् वैशिष्ट

Motorola Edge 60 Pro launch: मोटोरोलाचा एज 60 प्रो भारतात लाँच झाला आहे. ५० एमपी एआय ट्रिपल कॅमेरा, 1.5के क्वॉड-कर्व्ह डिस्प्ले, डायमेन्सिटी 8350 प्रोसेसर आणि DXOMARK वरील सर्वोच्च बॅटरी रेटिंग आणि प्री-ऑर्डर ३० एप्रिलपासून खरेदी करता येणार आहे.
Motorola Edge 60 Pro launch
MotorolaGOOGLE
Published On

मोटोरोलाकडून भारतात एज ६० प्रो लाँच करण्यात आला आहे. ज्‍यामध्‍ये ट्रू फ्लॅगशिप ग्रेड एआय अनुभव तुम्हाला मिळणार आहे. सेगमेंटमधील एकमेव ५० एमपी+५० एमपी+५०एक्‍स एआय कॅमेरा सिस्‍टम, जगातील सर्वोत्तम १.५के ट्रू कलर क्‍वॉर्ड-कर्व्‍ह डिस्‍प्‍ले, ६००० एमएएच बॅटरीसह डीएक्‍सओएमएआरकेवरील जगातील सर्वोच्‍च बॅटरी रेटिंग आणि किंमत फक्‍त २९,९९९ रूपयांपासून, प्रीऑर्डर ३० एप्रिल दुपारी १२ वाजल्‍यापासून सुरू होत आहे

● मोटोरोला एज ६० प्रो सेगमेंटमधील एकमेव ५० एमपी+ ५० एमपी +५०एक्‍स सर्वात प्रगत एआय कॅमेरासह प्रोफेशनलप्रमाणे फोटो व व्हिडिओ कॅप्‍चर करण्‍याची सुविधा देतो

● मोटोरोला एज ६० प्रो समर्पित एआय कीसह स्‍मार्टफोन्‍समधील एआयला नव्‍या उंचीवर घेऊन जातो, तसेच ऑन-डिवाईस मोटोएआयसह फ्लॅगशिप लेव्‍हल वैशिष्‍ट्ये देतो, जे तुमच्‍या पुढील मूव्‍हबाबत अंदाज लावू शकतात आणि स्क्रिनवरील कन्‍टेन्‍टनुसार संदर्भीय सल्‍ले देऊ शकतात

● या स्‍मार्टफोनमध्‍ये जगातील सर्वोत्तम १.५के ट्रू कलर क्‍वॉर्ड कर्व्‍ह डिस्‍प्‍ले आहे, जो आतापर्यंतच्‍या मोटोरोला फोनमधील सर्वात प्रखर, सर्वात वैविध्‍यपूर्ण डिस्‍प्‍ले आहे

Motorola Edge 60 Pro launch
Honeymoon Destinations: तुम्ही कमी बजेटमध्ये हनिमूनला जाण्याचा प्लान आखताय? मग 'या' सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या

● मोटोरोला एज ६० प्रो मध्‍ये प्रीमियर-ग्रेड, एआय-सुधारित कार्यक्षमतेसह मीडियाटेक डायमेन्सिटी ८३५० एक्‍स्‍ट्रीम चिपसेट, तसेच अत्‍यंत कार्यक्षम ४ एनएम तंत्रज्ञान आहे

● शक्तिशाली ६००० एमएएच बॅटरी असण्‍यासह डीएक्‍सओएमएआरकेचे गोल्‍ड लेबल सर्टिफिकेशन मिळाल्‍यानंतर जगातील सर्वोच्‍च बॅटरी रेटिंग असलेला मोटोरोला एज ६० प्रो सहजपणे दिवसभर कार्यरत राहतो. रिचार्जिंगसंदर्भात ९० वॅट टर्बोपॉवर™ चार्जर बॉक्‍समध्‍ये समाविष्‍ट आहे, जो फक्‍त काही मिनिटांच्‍या चार्जिंगमध्‍ये स्‍मार्टफोन जवळपास ४५ तासांपर्यंत कार्यरत राहण्‍याची खात्री देतो

● हा स्‍मार्टफोन वापरकर्त्‍यांना आयपी६८/आयपी६९ रेटिंगसह समाधान देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे, तसेच धूळ, घाण, वाळू व उच्‍च दबावाच्‍या पाण्‍यापासून उच्‍च दर्जाची सुरक्षितता देतो. तसेच, हा स्‍मार्टफोन ताज्‍या पाण्‍यामध्‍ये जवळपास ३० मिनिटांपर्यंत जवळपास १.५ मीटर खोलवर टिकून राहण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. मोटोरोला एज ६० प्रो टिकाऊपणासाठी मिलिटरी स्‍टँडर्ड्सची (एमआयएल-८१०एच) पूर्तता देखील करतो, जेथे अत्‍याधुनिक, आकर्षक लुक व फिल कायम ठेवतो

● मोटोरोला एज ६० प्रोची विक्री फ्लिपकार्ट, Motorola.in वर आणि भारतभरातील आघाडीच्‍या रिटेल स्‍टोअर्समध्‍ये फक्‍त २९,९९९ रूपयांच्‍या सुरूवातीच्‍या किमतीसह सुरू होईल. प्री-ऑर्डर आज ३० एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२ वाजल्‍यापासून सुरू होत आहे

एआय बाबत माहिती:

सेगमेंटमधील सर्वात वैयक्तिकृत व संदर्भीय एआय सादर करत मोटोरोला एज ६० प्रो मध्‍ये मोटो एआयची शक्‍ती आहे. हे पार्श्‍वभूमीवर कार्यरत राहत वापरकर्त्‍यांशी परस्‍परसंवाद व संलग्‍न होण्‍यासाठी स्‍मार्टर, अधिक सर्वोत्तम मार्ग देते.

तसेच नेक्‍स्‍ट मूव्‍ह वैशिष्‍ट्य वापरकर्त्‍यांच्‍या स्क्रिनवर असलेले कन्‍टेन्‍ट, जसे रेसिपी किंवा ग्रुप चॅट ओळखते आणि रिअल टाइममध्‍ये उपयुक्‍त पुढील स्‍टेप्‍स देते. नेक्‍स्‍ट मूव्‍ह वैशिष्‍ट्य एआय अनुभव घेण्‍यास नवीन आणि एक्‍स्‍प्‍लोअर करण्‍याची इच्‍छा असलेल्‍यांसाठी उपयुक्‍त आहे.

मोटोरोला एज ६० प्रो च्‍या लाँचसह मोटोरोला मोटो एआयच्‍या माध्‍यमातून, तसेच परप्‍लेक्सिटी, मायक्रोसॉफ्ट व गुगल यांच्‍यासोबत सहयोग करण्‍याद्वारे शक्तिशाली एआयला एकीकृत करत स्‍मार्टफोन अनुभवाला नव्‍या उंचीवर नेत आहे. वापरकर्ते स्‍मार्टर, अधिक स्थिर सपोर्टसाठी त्‍यांच्‍या पसंतीचे एआय असिस्‍टण्‍ट निवडू शकतात.

कॅमेरा बाबत माहिती:

मोटोरोला एज ६० प्रो शक्तिशाली एआय वैशिष्‍ट्यांच्‍या माध्‍यमातून स्‍मार्टफोन फोटोग्राफीला नव्‍या उंचीवर घेऊन जातो. प्रत्‍येक फोटोला आपोओपणे फाइन-टू्यून करणारे सिग्‍नेचर स्‍टाइल, गतीशील वस्‍तूंना सुस्‍पष्‍टतेसह कॅप्‍चर करणारे अॅक्‍शन शॉट आणि शेक-फ्री निष्‍पत्तींसाठी एआय-संचालित इमेज व व्हिडिओ स्‍टेबिलायझेशन अशा सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांसह प्रत्‍येक फोटो व व्हिडिओ आकर्षकरित्‍या कॅप्‍चर करता येतात. फोटो व व्हिडिओ एन्‍हासमेंट वैशिष्‍ट्ये लायटिंग, तपशील व रंग ऑप्टिमाइज करतात, तर ५०एक्‍स सुपर झूम अविश्‍वसनीय अचूकतेसह लांबच्‍या वस्‍तूंना जवळ आणते. पॅन्‍टोन®-व्‍हॅलिडेटेड कलर्स व स्किन टोन्‍ससह वास्‍तविक व्हिज्‍युअल्‍सना अधिक सुधारण्‍यात आले आहे, ज्‍यामधून प्रत्‍येक फ्रेममध्‍ये अद्वितीय वास्‍तविकतेची खात्री मिळते.

डिस्‍प्‍ले:

डिस्‍प्‍लेसंदर्भात मोटोरोला एज ६० प्रो मध्‍ये जगातील सर्वोत्तम १.५के ट्रू कलर क्‍वॉर्ड-कर्व्‍ह डिस्‍प्‍ले आहे, जो मोटोरोला फोनमधील आतापर्यंतचे ब्राइटेस्‍ट व सर्वात वैविध्‍यपूर्ण आहे. बोर्डरलेस ६.७ इंच पीओएलईडी स्क्रिन (९६.४७ टक्‍के स्क्रिन टू बॉडी रेशिओ) ४५०० नीट्सचे सर्वोच्‍च ब्राइटनेस देते, ज्‍यामधून शार्पर डिटेल आणि सुपर एचडी (१२२०पी) क्‍लेरिटीसह प्रमाणित फुल एचडी डिस्‍प्‍लेच्‍या तुलनेत १३ टक्‍के सर्वोत्तम रिझॉल्‍यूशन मिळते. क्‍वॉड-कर्व्‍ह एजेस् आणि अल्‍ट्रा-थिन बेझेल्‍स विनाव्‍यत्‍यय, सर्वोत्तम व्‍युइंग अनुभव देते, जे आकर्षक प्रतिसादासाठी अल्‍ट्रा-स्‍मूद १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि गतीशील ३०० हर्टझ टच रेटच्‍या माध्‍यमातून सुधारण्‍यात आले आहे. डीसीआय-पी३ कव्‍हरेज आणि पॅन्‍टोन व्‍हॅलिडेटेड कॅलिब्रेशनसह कलर्स पॉप-अप होतात, ज्‍यामधून अचूक रिअल-वर्ल्‍ड कलर सादर होण्‍यासह वास्‍तविक स्क्रीन टोन्‍सची खात्री मिळते.

डिझाइन व टिकाऊपणा:

मोटोरोला एज ६० प्रो मध्‍ये क्‍वॉर्ड-कर्व्‍ह डिझाइन आहे, जेथे कर्व्‍ह फ्रण्‍ट ग्‍लास मागील बाजूला साजेशी आहे, ज्‍यामधून स्‍लीक, एर्गोनॉमिक ग्रिप मिळते, ज्‍यामुळे स्‍मार्टफोन हातामध्‍ये सहजपणे मावून जातो. पॅन्‍टोन कलर इन्स्टिट्यूट™ सोबत सहयोगाने डिझाइन करण्‍यात आलेला हा स्‍मार्टफोन तीन विशेषरित्‍या क्‍यूरेट केलेल्‍या शेड्समध्‍ये येतो - पॅन्‍टोन शॅडो, डॅझलिंग ब्‍ल्‍यू आणि स्‍पार्कलिंग ग्रेप, जे जागतिक कलर ट्रेण्‍ड्ससंदर्भात वापरकर्त्‍यांना अग्रस्‍थानी ठेवतात. प्रीमियम लेदर-प्रेरित टेक्‍स्‍चर दैनंदिन वापरादरम्‍यान कोमल, टॅक्‍टाइल फिल देतो, तर डॅझलिंग ब्‍ल्‍यू कलरमधील नायलॉन-प्रेरित फिनिशमध्‍ये अत्‍याधुनिकता व अतिरिक्‍त टिकाऊपणाचे संयोजन आहे. वास्‍तविक विश्‍वातील साहसी कृत्‍यांसाठी डिझाइन करण्‍यात आलेला मोटोरोला एज ६० प्रो धूळ, वाळू व उच्‍च दबावाच्‍या पाण्‍यापासून संरक्षणासाठी आयपी६८/आयपी६९ प्रमाणित आहे आणि ३० मिनिटांसाठी जवळपास १.५ मीटर खोल ताज्‍या पाण्‍यामध्‍ये टिकून राहू शकतो.

उपलब्‍धता:

मोटोरोला एज ६० प्रो २५६ जीबी स्‍टोरेजसह ८ जीबी रॅम किंवा १२ जीबी रॅम या दोन स्‍टोरेज कन्फिग्‍युरेशन्‍समध्‍ये आणि पॅन्‍टोन डॅझलिंग ब्‍ल्‍यू, पॅन्‍टोन शॅडो व पॅन्‍टोन स्‍पार्कलिंग ग्रेप या तीन आकर्षक पॅन्‍टोन™ क्‍यूरेटेड कलर व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध असेल. हा स्‍मार्टफोन प्री-ऑर्डरसाठी आज ३० एप्रिलपासून उपलब्‍ध आहे आणि ७ मे २०२५ रोजी दुपारी १२ वाजल्‍यापासून फ्लिपकार्ट, Motorola.in वर व भारतभरातील आघाडीच्‍या रिटेल स्‍टोअर्समध्‍ये विक्रीला सुरूवात होईल.

लाँच किंमत:

८ जीबी + २५६ जीबी व्‍हेरिएण्‍टसाठी

लाँच किंमत: २९,९९९ रूपये

१२ जीबी + २५६ जीबी व्हेरिएण्‍टसाठी

लाँच किंमत: ३३,९९९ रूपये

Motorola Edge 60 Pro launch
Dharchula Tourism: भारतातील ऑफबीट हिल स्टेशन, येथील निसर्ग सौंदर्य पाहून भान हरपेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com