Saam Tv
नवीन जोडपं हनीमूनसाठी छान, शांत, कमी गर्दीच्या ठिकाणांसाठी जातंच असते.
पुढे आम्ही अशाच सुंदर ठिकाणांची नावे आणि खासियत सांगणार आहोत. जिथे कपल्सला क्वालीटी टाईम स्पेंड करता येईल.
तुम्ही समुद्र, रोमॅंटिक संध्याकाळ आणि हनीमूनचे क्षण अविस्मरणीय करणार असाल तर गोव्याला नक्की भेट द्या.
गोव्यात गेल्यावर तुम्ही वॉटर स्पॉट्स, कॅन्डल लाइट डिनर आणि सनसेट वॉक अशा गोष्टींचा आनंद घेऊ शकता.
बर्फाचे डोंगर आणि शांत वातावरण अनुभवण्यासाठी तुम्ही हिमाचलमध्ये वसलेल्या मनाली या ठिकाणाला नक्की भेट द्या.
तुम्हाला मनालीला जावून ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग असे विविध अॅडवेंचर अनुभवता येऊ शकतात.
उदयपूर हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. इथे तुम्हाला रोमॅंटिक वातावरण नेहमीच पाहायला मिळू शकते.
केरळ मध्ये खूप सुंदर वातावरणाचा आनंद घेऊ शकता. इथे हिरवळ समुद्राचा अनुभव तुमच्यासाठी अविस्मरणीय राहील.
स्वच्छ समुद्र, कमी लोक, नीळक्षार पाणी, शांतता आणि बोटींगचा अनुभव घ्यायचा असेल तर पुढील ठिकाणी नक्की जा.
अंदमान निकोबार हे ठिकाण कपल्ससाठी बेस्ट मानले जाते.