Morning Yoga Benefits : रोज सकाळी करा 'हे' योगासन, हृदयविकाराच्या आजारापासून राहाल दूर; जाणून घ्या फायदे

Healthy Heart Tips : योगासने केल्यावर माणूस अनेक आजारांपासून दूर राहतो. त्याचसोबत त्याच्या मनावरचा ताण कमी होतो.
Morning Yoga Benefits
Morning Yoga BenefitsSaam Tv
Published On

Surya Namaskar Benefits :

रोजच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा आपण शरीराकाडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे शरीराचे नुकसान होते. परिणामी आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक आजार जडतात.

रोजच्या जीवनात आजारांपासून दूर राहण्यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे योगासने. योगासने केल्यावर माणूस अनेक आजारांपासून दूर राहतो. त्याचसोबत त्याच्या मनावरचा ताण कमी होतो. यातील एक उत्यंत महत्त्वाचे आणि फायदेशीर योगासन म्हणजे सूर्य नमस्कार.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सूर्य नमस्कार (Surya Namaskar) केल्याने अनेक फायदे होतात. निरोगी आरोग्यासाठी रोज सकाळी १० मिनिटे योगासने करावीत. सकाळी सुर्योदयाच्या वेळी आणि रिकाम्या पोटी सूर्य नमस्कार केल्याने खूप फायदे (Benefits) होतात.

1. शरीराची स्थिती सुधारते

सूर्य नमस्कार केल्याने तुमच्या शरीराची स्थिती सुधारते. सूर्य नमस्कार केल्याने स्नायूंना फायदा होतो. मणक्याचे दुखणे, मानदुखी आणि पाठदुखी (Back Pain) अशा सर्व आजारांवर सूर्य नमस्कार फायदेशीर आहे. यामुळे शरीरातील स्नायू मजबूत होतात.

Morning Yoga Benefits
Most Famous Place In Pune : कपल्सला भुरळ घालणारे पुण्यातील सुंदर रत्न, निसर्गरम्य दृश्य पाहून प्रेमात पडाल!

2. मानसिक आजार दूर राहतात

सध्याच्या धावपळीच्या जीवनात मानसिक तणाव खूप असतो. त्यासाठी सूर्य नमस्कार फायदेशीर आहे. यामुळे झोपेच्या समस्या दूर होतात. परिणामी झोप चांगली झाल्यावर दिवस चांगला जातो आणि मानसिक आजार दूर होतात.

3. हृदयविकाराचा आजार दूर होतो

रोज सूर्य नमस्कार केल्याने हृदयाच्या समस्या दूर होतात. सूर्य नमस्कार केल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो. त्यामुळे हृदयविकाराच्या समस्या दूर होतील.

Morning Yoga Benefits
Bitter Gourd Recipe : कडू कारले खाताना मुले नाक मुरडताय? या टीप्स फॉलो करा, चवीने खातील

4. वजन कमी होते

सूर्य नमस्कार केल्याने शरीरातील अनावश्यक चरबी कमी होते. सूर्य नमस्कार केल्याने पचनक्रिया सुधारते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तसेच कॅलरी बर्न होण्यास मदत होते. त्यामुळे सूर्य नमस्कार आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com