Chronic Kidney Disease: ८० कोटींहून अधिक लोकांना किडनी डिसीजचा धोका; संशोधनातून आकडा समोर

Lancet Report: भारतामध्ये क्रॉनिक किडनी डिसीजची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून 2023 मध्ये तब्बल १३.८ कोटी प्रौढ प्रभावित आहेत. तज्ञांच्या मते वेळेत तपासणी आणि जागरूकता अत्यंत आवश्यक आहे.
Lancet Report
Chronic Kidney Diseasesaam tv
Published On
Summary

भारतात CKD रुग्णांची संख्या 2023 मध्ये १३.८ कोटींवर पोहोचली आहे.

जगभरात गेल्या तीन दशकांत CKD रुग्णसंख्येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे.

CKD फक्त किडनीवर नाही तर हृदयरोगाच्या धोक्यावरही मोठा परिणाम करतो.

भारतामध्ये क्रॉनिक किडनी डिसीज (CKD)या आजाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 2023 मध्ये तब्बल १३.८ कोटी प्रौढ या आजाराने प्रभावित असल्याचे नवीन आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. द लॅन्सेटच्या अहवालानुसार CKD आता जगातील नववा सर्वात मोठ्या मृत्यांच्या आकड्याचे कारण ठरत आहे. दरवर्षी अंदाजे १४.८ लाखांहून जास्त मृत्यू या आजारामुळे होत आहेत.

किडनीच्या आजाराची सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे दिसत नाहीत. अनेक रुग्णांना आपल्याला आजार आहे हे देखील कळत नाही. त्यामुळे अनेक भारतीयांमध्ये हा आजार गंभीर अवस्थेत पोहोचेपर्यंत जाणवत नाही. युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगो आणि जागतिक आरोग्य संस्थांच्या मदतीने करण्यात आलेल्या ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज 2023 अभ्यासातून दिसते की गेल्या तीन दशकांत जगभरात CKD रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. 1990 मध्ये 378 दशलक्ष असलेल्या रुग्णसंख्या 2023 मध्ये जवळपास 788 दशलक्षांवर पोहोचली. जागतिक स्तरावर CKD चे सरासरी प्रमाण 14.2% आहे, तर दक्षिण आशियामध्ये ज्यात भारताचा समावेश आहे हे प्रमाण 15.8% असून जगातील सर्वाधिक आहे.

Lancet Report
Sleep Depression : कमी झोप बदलतेय तुमचं आयुष्य, परिणाम इतके गंभीर की झोप उडेल, संशोधनातून धक्कादायक निष्कर्ष

यामधली गंभीर बाब म्हणजे CKD केवळ किडनीवर परिणाम करत नाहीतर हृदयरोगाचा धोका सुद्धा प्रचंड वाढवतं. 2023 मधील सर्व हृदयविकारजन्य मृत्यूंपैकी 11.5% मृत्यू CKD शी संबंधित आढळले. त्यामुळे किडनीचे आजार हे हृदयरोगासाठी सातवे मोठे कारण ठरले आहे.

तज्ञांचे मत आहे की भारताने तातडीने स्क्रीनिंग, प्रिव्हेंशन आणि जनजागृती यावर भर देणे अत्यावश्यक झाले आहे. किडनीचे आजार जागतिक आरोग्य व्यवस्थांसाठी वे़क अप कॉलप्रमाणे कार्य करतात. जोखीम असलेल्या लोकांची विशेषतः डायबेटीज आणि हाय ब्लड प्रेशर असलेल्या व्यक्तींची नियमित तपासणी केल्यास हा आजार लवकर ओळखता येतो आणि योग्य उपचारांनी त्याची प्रगती थांबवता येते.

मागील दशकात CKD साठी उपलब्ध उपचार पद्धतीत मोठी सुधारणा झाली असून वेळेत हस्तक्षेप केल्यास dialysis किंवा प्रत्यारोपणाची गरज टाळता येऊ शकते. जागतिक संस्थांनीदेखील या विषयाची गंभीर दखल घेतली आहे. संयुक्त राष्ट्रांनी CKD ला महत्वाचा आरोग्य धोका मान्यता दिली आहे तर मे 2025 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 2030 पर्यंत नॉन-कम्युनिकेबल डिसीज मधील अकाली मृत्यू एकतृतीयांशाने कमी करण्याच्या उद्दिष्टात CKD ला समाविष्ट केले आहे.

सूचना: या बातमीत दिलेली माहिती सर्वसाधारण स्वरूपाची असून ती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. कोणतीही आरोग्यविषयक लक्षणे असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. साम टिव्ही या माहितीची जबाबदारी घेत नाही.

Lancet Report
Post Diwali Skin Care: दिवाळीनंतर वाढत्या प्रदूषणामुळे त्वचेची घ्या अशा प्रकारे काळजी; फॉलो करा या टीप्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com