Monsoon Urine Infection: पावसाळ्यात सतत लघवीला जावं लागतं, इन्फेक्शन झालंय? त्रासापासून मुक्त होण्यासाठी या टिप्स फॉलो करा

Urine Infection Prevention: यूटीआय संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी खालील टिप्सचा अवलंब करा.
Monsoon Urine Infection
Monsoon Urine InfectionSaam Tv
Published On

Urine Infection Symptoms : त्वचा आणि पोटाच्या संसर्गाप्रमाणेच पावसाळ्यात मूत्रमार्गासंबंधीत संक्रमण (यूटीआय) ही एक सामान्य समस्या आढळून येते. यूटीआय संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी खालील टिप्सचा अवलंब करा.

पुण्यातील अंकुरा हॉस्पिटलचे प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद कुलट म्हणतात की, पावसाळ्यात युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) होण्याची शक्यता वाढते. तुम्हाला माहीत आहे का? हवामानात अचानक बदल झाल्यामुळे यूटीआय संसर्गाचे प्रमाण अधिक दिसून येते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि संक्रमणाची अधिक शक्यता असते. हवेतील ओलसरपणा आणि आर्द्रता जीवाणूंच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार करते, ज्यामुळे यूटीआय संसर्गाती शक्यता वाढते.

Monsoon Urine Infection
Frequent Urination : वारंवार लघवी होतेय ? असू शकते गंभीर आजारांचे लक्षण, जाणून घ्या कारण

1. मूत्रमार्गाच्या संसर्गाची लक्षणे

जेव्हा बॅक्टेरिया मूत्रात प्रवेश करतात, वाढू लागतात आणि पसरतात तेव्हा यूटीआय संसर्ग होतो. सामान्यतः हा जिवाणू संसर्ग मूत्रमार्गाच्या खालील भागापासून सुरू होतो आणि जो नंतर वरच्या दिशेने मूत्रमार्गात प्रवेश करतो. उपचार न केल्यास, संसर्गामुळे मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते.

यूटीआय संसर्गाच्या लक्षणांमध्ये लघवी (Urine) करताना वेदना आणि जळजळ, लघवी करण्याची वारंवारता आणि अनियंत्रित इच्छा, गडद आणि दुर्गंधीयुक्त लघवी, थकवा, ओटीपोटात वेदना, ताप, मळमळ आणि उलट्या यांचा समावेश होतो. म्हणून ही लक्षणे आढळली तर, कोणत्याही निष्काळजीपणा न करता वैद्यकीय सल्ला घेणे महत्वाचे ठरते. तपासणीनंतर डॉक्टर (Doctor) काही औषधे लिहून देतील त्याचे न चुकता सेवन करा. स्वतःच्या मर्जीने औषधांचे सेवन करणे टाळा कारण ते धोकादायक ठरु शकते.

Monsoon Urine Infection
Weekly Rashibhavishya Marathi: लवकरच बुधादित्य राजयोग! ऑगस्टमध्ये या राशी मालामाल, यश-प्रगतीचा सुखद काळ...

2. प्रतिबंधात्मक उपाय कोणते?

1. पुरेसे पाणी प्या

पुरेसे पाणी (Water) प्यायल्याने तुमच्या शरीरातील घाण बाहेर काढून टाकण्यास मदत होते आणि आरोग्य सुधारते. अल्कोहोल, कॉफी, कोर्बोनेटेड पेयांच्या अतिरिक्त सेवनाने मूत्राशयाची जळजळ होऊ शकते. मसालेदार, तेलकट, प्रक्रिया केलेले आणि जंक फूडपासून दूर रहा.

2. लघवी रोखून धरणे टाळा:

लघवी रोखुन न ठेवता मूत्रमार्गात संसर्ग होऊ शकतो आणि बॅक्टेरियाची वाढ होते. योनिमार्गाच्या भागात केमिकलयुक्त उत्पादने वापरणे देखील हानिकारक ठरु शकते. आपल्या नाजुक भागात केमिकलयुक्त घटक असलेले उत्पादने, डाऊचिंग पावडर किंवा परफ्युमचा वापर करणे टाळा कारण ते योनिमार्गात संसर्ग, वेदना आणि जळजळ निर्माण करु शकतात.

Monsoon Urine Infection
One Day Trip In Badlapur: निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यायचाय? बदलापूरमधली ही ठिकाणे आहेत मनमोहक!

श्वास घेण्यायोग्य सुती अंतर्वस्त्र वापरा आणि ते रोजच्या रोज बदला. वैयक्तिक स्वच्छता राखण्यास प्राधान्य द्या. घट्ट कपड्यांचा वापर टाळा कारण यामुळे संवेदनशील भागात ओलावा राहू शकतो. रक्त प्रवाह सुधारण्यासाठी आणि बॅक्टेरियाची वाढ रोखण्यासाठी सैलसर कपडे वापरा. स्वच्छतेच्या दरम्यान योनी किंवा मूत्रमार्गात बॅक्टेरिया पसरू नयेत म्हणून वरुन खालच्या दिशेने स्वच्छता करा. वरील सर्व टिप्सचे पालन करा आणि संसर्गापासून दूर रहा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com