Frequent Urination : वारंवार लघवी होतेय ? असू शकते गंभीर आजारांचे लक्षण, जाणून घ्या कारण

जास्ती वेळा लघवी येत असेल तर त्या मागचे कारण जाणून घेणे गरजेचे असते
Frequent Urination
Frequent UrinationSaam Tv
Published On

Frequent Urination : एक सामान्य व्यक्ती दिवसातून आठ ते दहा वेळा लघवी करते.पण त्यापेक्षा जास्ती वेळा लघवी येत असेल तर त्या मागचे कारण जाणून घेणे गरजेचे असते सामान्यपणे जर तुम्ही जास्त पाणी पीत असाल तर असे होऊ शकते.

तसेच हिवाळा किंवा पावसाळ्यात या समस्या अधिक होत असतात. त्यामुळे आपण याकडे जास्ती लक्ष देत नाही परंतु जर असे वारंवार होत असेल तर याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच काही लोक जास्त पाणी पीत नाही तरीही त्यांना वारंवार लघवी येण्याचा त्रास होत असतो. काही आजारांमुळे (Disease) या समस्या होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया त्या आजारांबद्दल.

Frequent Urination
Urine Infection Problem : महिलांना युरिन इन्फेक्शन सहज का होते? जाणून घ्या, कारणे

1. मधुमेह

मधुमेहाच्या काही लक्षणांपैकी वारंवार लघवी येणे हे एक मुख्य लक्षण आहे. युकेच्या नॅशनल हेल्थ सर्विस नुसार एक व्यक्ती दिवसातून तीन लिटर लघवी करते.परंतु जेव्हा त्यांना मधुमेहाच्या समस्या असते तेव्हा ते प्रमाण तीन लिटर वरून वीस लिटरपर्यंत जाते. जर तुम्ही दिवसातून सात ते दहा वेळा लघवीला गेला तर मधुमेह टाईप एक किंवा टाईप दोन दर्शवते त्यामुळे जर तुम्हाला वारंवार लघवी येण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही त्वरित मधुमेह (Diabetes) तपासणी केली पाहिजे.

2. ओव्हरऍक्टिव्ह मूत्राशय

ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये वारंवार लघवी होण्याची भावना असते त्यामुळे तुमच्या दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण होऊ शकतो वारंवार लघवी येणे हे या स्थितीचे साधारण लक्षण आहे.

Frequent Urination
Frequent UrinationCanva

3. पुरुषांमध्ये प्रोस्टेट संबंधित समस्या

पुरुषांना वारंवार लघवी येणे हे प्रोस्टेटच्या समस्येचे लक्षण आहे. हा कर्करोगाशी संबंधित आहे प्रोस्टेट मधील पेशी अनियंत्रितपणे वाढते तेव्हा कर्करोगाची (Cancer) समस्या निर्माण होतात.

Frequent Urination
Smell in Urine : लघवीला वास येतोय? काय आहेत याची कारणे, जाणून घ्या

4. युरीनरी ट्रॅक इन्फेक्शन

या समस्या महिलांमध्ये (Women) आढळून येतात. जेव्हा जंतू मूत्रसंस्थेला संक्रमित करतात तेव्हा हा रोग होतो. मूत्रपिंड, मूत्राशय आणि त्यांना जोडणारा नळयावरही याचा परिणाम होतो. UTI हा एक सामान्य आजार आहे तो बहुतेक स्त्रियांमध्ये आढळतो त्याचे कारण वारंवार लघवी येणे किंवा लघवी मध्ये रक्तही येणे असते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com