Monsoon Treks In Maharashtra: पावसाळ्यात ट्रेकिंगचा प्लान करणाऱ्यासाठी महाराष्ट्रातील 'ही' ४ स्थळे ठरतील बेस्ट

Monsoon Treking Spot in Maharashtra: पावसाळा सुरू झाला की, अनेकजण निर्सगाच्या सानिध्यात फिरण्यासाठी प्लान करतात. जून महिना सुरू झाला की, ट्रेकर्सप्रेमींना वेध लागते ते म्हणजे डोंगरदऱ्यामध्ये फिरायला जाण्याचे. महाराष्ट्र हे निसर्गाच्या सौंदर्याने नटलेले राज्य आहे.
Best Treks In Maharashtra: पावसाळ्यात ट्रेकिंगचा प्लान करणाऱ्यासाठी महाराष्ट्रातील 'ही' ४ स्थळे ठरतील बेस्ट
Monsoon Treks In MaharashtraSaam TV

पावसाळा (Monsoon) सुरू झाला की, अनेकजण निर्सगाच्या सानिध्यात फिरण्यासाठी प्लान करतात. जून महिना सुरू झाला की, ट्रेकर्सप्रेमींना वेध लागते ते म्हणजे डोंगरदऱ्यामध्ये फिरायला जाण्याचे. महाराष्ट्र हे निसर्गाच्या सौंदर्याने नटलेले राज्य आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणे आहेत, जेथे फिरायला पर्यटकांना आवडते. आज आम्ही तुम्हाला अशीच ४ ठिकाणे सांगणार आहोत, जे तुमचा मान्सून ट्रेकचा आनंद वाढवतील.

Best Treks In Maharashtra: पावसाळ्यात ट्रेकिंगचा प्लान करणाऱ्यासाठी महाराष्ट्रातील 'ही' ४ स्थळे ठरतील बेस्ट
Mumbai Tourist Places : वटपौर्णिमेला पतीसोबत फिरण्यासाठी मुंबईतील भन्नाट ठिकाणं; मूड रिफ्रेश होईल

१) कलावंतीण दुर्ग

कलावंतीण दुर्ग हा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय ट्रेकिग पॉईंट आहे. कलावंतीण दुर्ग रायगड जिल्ह्यात पनवेलच्या पूर्वेला माथेरानला लागून आहे. जो पुणे-मुंबई दिशेच्या हायवेवरून काही तासांच्या अंतरावर आहे. कलावंतीण दुर्गाला कलावंतीण शिखर म्हणून देखील ओळखले जाते. कलावंतीण दुर्गाच्या पायथ्याशी एक गुहा आहे. गडाचा तळ सपाट असून ट्रेकिंग प्रेमींना जाण्यासाठी सोयीस्कर आहे.

) हरिश्चंद्र ट्रेक

हरिश्चंद्र गड हा किल्ला अहमदनगर जिल्ह्यात येतो. हरिश्चंद्र गड हा एक ऐतिहासिक किल्ला असून अनेक ट्रेकर्स पावसाळ्यात या किल्ल्याला भेट देतात. पावसाळ्यात हिरव्यागार समृद्धाने नटलेला हा किल्ला पर्यटकांना आकर्षित करतो.

३) देवकुंड धबधबा

देवकुंड धबधबा हा रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात आहे. पुण्यापासून फक्त काही तासांच्या अंतरावर हा धबधबा आहे. या धबाधब्याचे मुख्य आकर्षक म्हणजे डायनोसॉरच्या काळातील महाकाय अजगाराने टाकलेल्या कातेच्या सारखा वाटणारा हा धबधबा आहे. हा धबधब्याचा आनंद घेण्यासाठी ट्रेकर्स या ठिकाणी भेट देतात.

४) भीमाशंकर ट्रेक

भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आहे. मुंबईहून दोन ते तीन तासांच्या अंतरावर हे ठिकाण आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे ३२५० फूट उंचीवर आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगेने वेढलेल्या या ठिकाणाला भेट देण्यासाठी ट्रेकर्स येतात.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com