

Child Health Tips For Rainy Season : पावसाळा जितका अल्हादायक असतो तितकाच विषाणू, जीवाणू आणि यीस्ट संसर्ग वाढीसाठी हा उत्तम काळ मानला जातो. या दिवसांमध्ये विषाणूजन्य ताप, मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया यांसारख्या संसर्गाची लागण लहानग्यांना होण्याची शक्यता असते.
डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियाच्या ठराविक लक्षणांमध्ये ताप, अंगदुखी, पुरळ उठणे, उलट्या होणे आणि पोटात दुखणे यांचा समावेश आहे. डेंग्यूच्या बाबतीत ओटीपोटात दुखणे, सतत उलट्या होणे, सुस्ती आणि रक्तस्त्राव यासारख्या धोकादायक लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका आणि पालकांनी याकडे दुर्लक्ष न करु नये.
खारघर येथील मदरहुड हॉस्पीटलचे नवजात शिशु आणि बालरोग तज्ज्ञ डॉ सुरेश बिराजदार म्हणतात की, उघड्यावरचे अन्न पदार्थ (Food) आणि दुषित पाण्यामुळे देखील कृमींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. अन्न आणि पाण्यामुळे होणारे आजार हे लहान मुलांमधील (Child) निर्जलीकरणास कारणीभूत ठरतात. पालकांनी आपल्या मुलाच्या आरोग्याची (Health) काळजी घेणे आवश्यक आहे.
1. पालकांनी या टिप्स पाळाव्या
1. पालकांनी चांगल्या स्वच्छता आणि सवयींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शाळेतून किंवा खेळाच्या मैदानातून घरी आल्यानंतर मुलांना नियमितपणे हात धुण्यास आणि आंघोळ करण्यास प्रवृत्त करा.
2. मुलांनी उकळलेले पाणी पिणे, बाहेरच्या अन्न पदार्थांचे सेवन टाळणे, घरी बनवलेल्या ताज्या अन्नाचे सेवन करणे आणि फळे आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेळ करणे आवश्यक आहे, परंतु ते वापरण्यापुर्वी स्वच्छ पाण्याने धुतल्याची खात्री करा.
3. कच्च्या अन्नाचे सेवन टाळा, उच्च प्रथिनयुक्त आहार, व्हिटॅमिन (Vitamin) सी आणि व्हिटॅमिन ई चा समावेश असलेल्या पदार्थांची निवड करा. जसे की आवळा, संत्री, शिमला मिरची, शेवग्याच्या शेंगा, सुकामेवा आणि तेलबिया यांचा आहारात समावेश करा.
4. चरबीयुक्त पदार्थ, तेलकट पदार्थ खाल्ल्याने अपचन होऊ शकते. पालकांनी ही खात्री केली पाहिजे. दह्यामध्ये प्रीबायोटिक भरपूर प्रमाणात असते आणि ते नियमितपणे खाण्याचा प्रयत्न करावा.
5. साचलेले पाणी हे डासांच्या उत्पत्तीचे ठिकाण असते त्यासाठी डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी जार, फुलदाण्या, वॉटर कुलर, घराबाहेर किंवा डस्टबिनमध्ये साचलेले पाणी काढून टाका आणि आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि कोरडा राखण्याचा प्रयत्न करा.
6. मुलांनी पावसाच्या घाणेरड्या पाण्यात खेळू नये याची काळजी घ्या कारण असे केल्याने त्वचेला ऍलर्जी आणि संसर्ग होऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.