Milk Benefits :कामाचा ताण-थकवा येतोय? दूधात 'हा' पदार्थ मिसळा, झटक्यात वाटेल फ्रेश

Health: दूध पिताना आपण त्यात हळद मिक्स करतो. मात्र त्या ऐवजी असे काही पदार्थ आहेत ज्याचा वापर केल्याने तुमचा ताण काही क्षणातच कमी होऊ शकतो.
Health
Milk Benefits Saam Tv
Published On

आजीच्या काळापासून औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले हळदीचे दूध आरोग्यासाठी वरदान मानले गेले आहे. पण तुम्हाला माहित आहे का की हळदीच्या दुधात काही नैसर्गिक गोष्टी मिसळून तुम्ही त्याचे फायदे दुप्पट करू शकता. या पद्धतीने हळदीचे दूध तयार करून प्यायल्याने तुम्ही आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकता. हळदीच्या दुधाची शक्ती वाढवणाऱ्या या रेसिपीबद्दल जाणून घेऊया.

हळदीचे दूध कसे बनवायचे?

हळदीचे दूध बनवण्यासाठी तुम्हाला एक ग्लास साखर नसलेले दूध, एक चमचा हळद, अर्धा चमचा दालचिनी पावडर, किसलेले आल्याचा एक छोटा तुकडा आणि चिमूटभर काळी मिरी पावडर लागेल. या सर्व पोषक तत्वांनी युक्त अशा गोष्टी एका कढईत ठेवा आणि उकळा. 10 मिनिटांनी गॅस बंद करून गाळून घ्या. आता तुम्ही हे हळदीचे दूधाचे सेवन करू शकता.

Health
Cancer Symptoms: तुम्हाला सतत अ‍ॅसिडीटी होतेय का? हे कॅन्सरचे लक्षण असू शकतं? वाचा संपुर्ण माहिती

आरोग्यासाठी वरदान

आयुर्वेदानुसार हळदीचे दूध प्यायल्याने तुमचा मूड बऱ्याच प्रमाणात सुधारू शकतो. हळदीचे दूध प्यायल्याने शरीराला आराम मिळतो. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे नैसर्गिक पेय नियमितपणे सेवन केले जाऊ शकते. एवढेच नाही तर हळदीचे दूध तुमच्या आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील प्रभावी ठरू शकते.

हळदीचे दूध कधी प्यावे?

रात्री हळदीचे दूध पिणे अधिक फायदेशीर ठरू शकते. रात्री हळदीचे दूध प्यायल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते. मात्र, तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या गरजेनुसार सकाळी किंवा दुपारी ते पिऊ शकता. एकंदरीत, हळदीचे दूध तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकते आणि तुमच्या शरीरात शक्ती भरू शकते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Written By: Sakshi Jadhav

Health
Guava: हिवाळ्यात पेरू खाण्याची देसी स्टाईल; 'हे' 5 आजार फिरकणारही नाहीत

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com