Meta Brain: आता माणसाचा मेंदू कॉपी होणार? मेटानं बनवला 'डिजिटल ब्रेन'

Meta Creates Digital Brain: मेटानं आता एक असा डिजिटल ब्रेन तयार केलाय. जो तुमच्या भावना समजून घेऊ शकतो. त्यामुळे माणसाच्या मेंदूची क़ॉपी करणारा? हा डिजिटल ब्रेन नेमका का विकसित करण्यात आलाय? या तंत्रज्ञानाचा फायदा कुणाला होणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Meta Creates Digital Brain:
Meta introduces a groundbreaking ‘digital brain’ technology that can interpret human emotions.
Published On

तुमचा आवाज, भाषा आणि तुमच्या भावना आता फक्त तुमच्यापुरत्या मर्यादीत राहणार नाहीत कारण मार्क झुकरबर्गच्या 'मेटा' कंपनीने तंत्रज्ञान विश्वात एक असा धमाका केलाय, ज्यामुळे मानवी मेंदू आणि मशीनमधील दरी कायमची पुसली जाणार आहे... मानवी मेंदूची ..त्याच्या भावभावनांची हूबेहूब डिजिटल नक्कल करणारं 'ट्राईब v2' मॉडेल त्यानी आणलं आहे.

Meta Creates Digital Brain:
New Covid Variant : कोरोना पुन्हा आला, ७५ म्यूटेशनसह नवा व्हेरियंट, तुम्हाला किती धोका?

ट्राईब v2 मॉडेल हे फाउंडेशन मॉडेल असून मानवी मेंदूचा डिजिटल आरसा म्हणून काम करते. हे मॉडेल पाहण्याच्या, ऐकण्याच्या आणि भाषेच्या गोष्टींवर मेंदू कशी प्रतिक्रिया देतो हे अचूकपणे अंदाज लावू शकते. यामुळे न्यूरोसायन्स संशोधनात मोठा बदल घडणार आहे.

हे मॉडेल प्रामुख्यानं तीन टप्प्यात काम करत असून पहिल्या टप्प्यात मॉडेल दृश्य, आवाज आणि मजकूर यांना डिजिटल स्वरूपात रूपांतरित करते. दुसऱ्या टप्प्यात मानवी मेंदू माहितीवर कशी प्रक्रिया करतो याचे पॅटर्न शोधते.आणि तिसऱ्या टप्प्यात एखादी गोष्ट पाहिल्यावर किंवा ऐकल्यावर मेंदूचा कोणता भाग सक्रिय होईल, हे सांगते.

Meta Creates Digital Brain:
High Blood Pressure : आहारात करा या ६ गोष्टींचा समावेश; ब्लड प्रेशरच्या धोका होईल कमी, डॉक्टरांनी सांगितला डाएट प्लान

याआधी शास्त्रज्ञांना मेंदूच्या क्रियांचा अभ्यास करण्यासाठी महागडी आणि वेळखाऊ fMRI स्कॅनिंग करावी लागायची... त्यात एका रंगावर किंवा आवाजावर मेंदू कशी प्रतिक्रिया देतो हे समजून घेण्यासाठी अनेक लोकांना मशीनसाठी तासनतास रेकॉर्डिंग करावी लागे. मात्र ट्राईब मॉडेलमुळे महिन्यांचे काम, प्रचंड खर्च तर वाचेलच पण हे स्कॅनिंग काही सेकंदात पूर्ण होते... सध्या मेटाने हे मॉडेल पूर्णपणे ओपन सोर्स केले आहे. कोड, पेपर आणि डेमो सर्वांसाठी उपलब्ध आहेत. यामुळे न्यूरोसायंटिस्ट, AI संशोधक आणि डॉक्टरांना मेंदूच्या रहस्यांचा अभ्यास वेगाने करता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com