रजोनिवृत्तीचा हाडं-हृदयाच्‍या आरोग्‍यावर होतो परिणाम; तज्ज्ञांनी स्पष्ट केलं कसा होतो परिणाम

महिलांना एका वयानंतर रजोनिवृ्त्तीचा सामना करावा लागतो. रजोनिवृत्तीचा परिणाम त्या महिलेच्या आरोग्यावर देखील होतो.
women business ideas
Free Lance WritingYandex
Published On

महिलांना एका वयानंतर रजोनिवृ्त्तीचा सामना करावा लागतो. रजोनिवृत्तीचा परिणाम त्या महिलेच्या आरोग्यावर देखील होतो. मात्र अनेक महिलांना याबाबत माहिती नाही. रजोनिवृत्तीमुळे विविध प्रकारचे बदल होऊ शकतात. पण या टप्‍प्‍यादरम्यान महिलांच्‍या शरीरात बदल होण्‍यासोबत इस्‍ट्रोजेन पातळ्यांमध्‍ये घट होते हे लक्षात असणे देखील महत्त्वाचे आहे.

रजोनिवृत्तीनंतर आरोग्‍यावर होणारे परिणाम माहित असणं आवश्‍यक

मुंबईतील सूर्या हॉस्पिटलमधील प्रसूती आणि स्‍त्रीरोग विभागाच्‍या संचालक डॉ. सुचित्रा पंडित म्‍हणाल्‍या, "भारतातील रजोनिवृत्ती घेणाऱ्या महिलांवर आधारित संशोधनांमधून निदर्शनास आलंय की, नोंदणी झालेली सर्वात सामान्‍य लक्षणं म्‍हणजे वेदनादायी क्रॅम्प रात्रीच्‍या वेळी घाम येणं तसेच इतर लक्षणे जसं झोप न लागणे, चिंता, चिडचिड, सांधेदुखी आणि योनीमार्गात कोरडेपणा.

women business ideas
World food day: तुम्हाला माहितीये का फूड एलर्जी आणि फूड इंटोलेरेंसमधील नेमका फरक? तज्ज्ञांनी दिली संपूर्ण माहिती

इंडियन मेनोपॉज सोसायटीने केलेल्‍या संशोधनामध्‍ये या लक्षणांचे प्रमाण ७५ टक्‍के असल्‍याचे आढळून आले. या लक्षणांबाबत जागरूकता हळूहळू वाढत असली तरी आम्‍हाला अंदाज आहे की, कमी महिलांना रजोनिवृत्तीचा आरोग्‍यावर होणाऱ्या परिणामांबाबत माहिती आहे. इस्‍ट्रोजेन पातळ्या कमी झाल्‍यामुळे महिलांना ऑस्टियोपोरासिस, हृदयसंबंधित आजार आणि मसल मास लॉसचा मोठा धोका असू शकतो. रजोनिवृत्तीच्‍या हाडे आणि हृदयाच्‍या आरोग्‍यावर होणाऱ्या परिणामांबाबत माहित असल्‍याने त्‍यांना परिणामांना ओळखण्‍यासोबत त्‍यावर प्रतिबंध ठेवण्‍यास किंवा लवकर निराकरण करण्‍यास मदत होऊ शकते, असं डॉ. पंडित म्हणाल्या.

अॅबॉट इंडियाच्‍या मेडिकल अफेअर्स हेड डॉ. रोहिता शेट्टी यांच्या सांगण्यानुसार, "महिलांना रजोनिवृत्तीचा हाडं आणि हृदयाच्‍या आरोग्‍यावर होणाऱ्या परिणामांबाबत समजण्‍यास मदत करणं महत्त्वाचं आहे. आ्ही केलेल्‍या सर्वेक्षणानुसार ८२ टक्‍के व्‍यक्‍तींच्या म्हणण्यानुसार, रजोनिवृत्तीचा महिलांच्‍या वैयक्तिक स्‍वास्‍थ्‍यावर परिणाम होतो. यामुळे महिलांना रजोनिवृत्तीदरम्‍यान आणि त्‍यानंतरच्‍या काळामध्‍ये त्‍यांच्‍या आरोग्‍याची काळजी घेण्‍यास मदत करणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे.

रजोनिवृत्तीनंतर होणारा सर्वात सामान्‍य आजार

रजोनिवृत्तीनंतर होणारा सर्वात सामान्‍य आजार म्‍हणजे ऑस्टियोपोरोसिस, जो ५० वर्षांवरील तीनपैकी एका महिलेला होतो. इस्‍ट्रोजेनच्‍या पातळ्यांमध्‍ये घट झाल्‍यामुळे हा आजार होतो. यामध्ये हाडांची झीज होते आणि स्‍नायूबळ कमकुवत होतं. ज्‍यामुळे हाटं मोडण्याचा धोका वाढतो. आज भारतातील जवळपास ६१ दशलक्ष व्‍यक्‍तींना ऑस्टियोपोरोसिस आहे आणि त्‍यांच्‍यापैकी ८० टक्‍के महिला आहेत.

women business ideas
Stomach Cancer: पोटाच्या कॅन्सरपूर्वी महिलांच्या शरीरात दिसतात 'हे' बदल; अजिबात दुर्लक्ष करू नका

ऑस्टियोपोरोसिस म्हणजे काय?

ऑस्टियोपोरोसिस एक मूक आजार असून ज्‍यामध्‍ये फ्रॅक्‍चर होत नाही तोपर्यंत लक्षणं दिसून येत नाही. ऑस्टियोपोरोसिसशी संबंधित दुखापती गंभीर असू शकतात आणि वेदना होण्‍यासोबत दीर्घकाळापर्यत विकलांगत्‍व येऊ शकते. डॉक्‍टरांसोबत सल्‍लामसलत आणि जोखीम घटक जाणून घेणं महत्त्वाचं आहे. हाडे मजबूत करण्‍यासाठी जीवनशैलीमध्‍ये काही बदल करता येऊ शकतात, जसे नियमितपणे व्‍यायाम करणं, फळें भाज्‍यांचा समावेश असावा.

रजोनिवृत्तीनंतर हृदयाच्या आजारांचा धोका वाढतो

रजोनिवृत्तीनंतर हृदयाच्या आजारांचा धोका देखील वाढतो. यामागील कारण म्‍हणजे इस्टरोजेनच्या कमतरतेमुळे लिपिड पातळ्यांमध्‍ये बदल होऊ शकतात. जसं कोलेस्‍ट्रॉलमध्‍ये वाढ होऊ शकते. रजोनिवृत्तीशी संबंधित रात्रीच्‍या वेळी घाम येणं यामुळे उच्‍च रक्‍तदाब आणि इतर कार्डियोव्‍हॅस्‍कुलर संबंधित जोखीम घटकांचा धोका वाढू शकतो. त्याचप्रमाणे वयाच्‍या उत्तरार्धात नैसर्गिकपणे रजोनिवृत्ती येणाऱ्या महिलांना कार्डियोव्‍हॅस्‍कुलर आजाराचा धोका कमी असतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com