Marriage Muhurta 2024 : शुभमंगल सावधान! फेब्रुवारी महिन्यात लग्नाचे शुभ मुहूर्त कधी? पाहा यादी

Gruh Parvesh Muhurt 2024 : पौष महिना संपला की, लग्नकार्याला सुरुवात होते. अनेक घरात सनई चौघडे वाजू लागतात. परंतु, कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी आपण अनेक गोष्टींची काळजी घेतो.
Marriage Muhurta 2024
Marriage Muhurta 2024Saam Tv
Published On

Vivah Shubh Muhurat Febrauary 2024 :

पौष महिना संपला की, लग्नकार्याला सुरुवात होते. अनेक घरात सनई चौघडे वाजू लागतात. परंतु, कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी आपण अनेक गोष्टींची काळजी घेतो.

हिंदू धर्मात शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त पाहिला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार कोणतीही शुभ गोष्ट करण्यासाठी आपण शुभ मुहूर्त पाहायला हवा. ज्यामुळे आपले बिघडणारे काम देखील सुरळीत होते.

लग्न (Marraige) करण्यापूर्वी वधु- वरांच्या कुंडल्या पाहिल्या जातात. त्यानुसार मग शुभ तारीख, वार, तिथी आणि योग बघून लग्न ठरवले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार लग्नासारख्या शुभ कार्यासाठी शुक्राचा उदय आवश्यक आहे.

Marriage Muhurta 2024
February Horoscope 2024 : ४ मोठ्या ग्रहांचे संक्रमण! व्यापारात होईल अचानक धनलाभ, मिळतील नवीन नोकरीच्या संधी

हिंदू धर्मात लग्नाची तारीख निश्चित करताना विवाह मुहूर्त महत्त्वाची भूमिका बजावते. असे मानले जाते की, अशुभ मुहूर्तावर केलेले विवाह अनेकदा जोडप्यावर (Relation) नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे लग्न हे फक्त शुभ मुहूर्तावर केले जाते. २०२४ च्या फेब्रुवारी महिन्यात कोणकोणत्या तारखेला लग्नासह गृहप्रवेश, नामकरण मुहूर्त कधी जाणून घेऊया.

1. फेब्रुवारी 2024 लग्नाचा शुभ दिवस

४, ६, ७, ८, १२, १३, १७, २४, २५, १६ आणि २९ फेब्रुवारी २०२४

2. फेब्रुवारी 2024 मध्ये गृहप्रवेशासाठी शुभ दिवस

१२, १४, १९, २४, २६ आणि २९ फेब्रुवारी २०२४.

Marriage Muhurta 2024
Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 : या ५ राशींना मिळणार जोडीदाराची साथ, नवीन नोकरीची ऑफर; खर्चात होईल वाढ

3. फेब्रुवारी 2024 मध्ये नामकरणासाठी शुभ दिवस

०१, ०२, ०४, ०८, ११, १४, १८, २१, २२, २५, २६ आणि २९ फेब्रुवारी २०२४

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com