
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आइसक्रीम खायला आवडे. उन्हाळ्यात थंड-थंड आइसक्रीम खाण्याची मज्जा वेगळीच असते. लहानांना तर ते खूप आवडते. लहान मुले तर दररोज आइसक्रीम खाण्याचा हट्ट करतात. परंतु रोज खाल्याने त्याचा शरिरावर वाईट परिणाम होऊ शकतो. आइसक्रीम जास्त काळ टिकुन राहण्यासाठी त्यात वेगवेगळे केमिकल वापरले जातात. त्यामुळे त्याचं जास्त प्रमाणात सेवन करणं योग्य नाही आहे. तर घरच्याघरी चवीष्ट आइसक्रीम कसा बनवायचा हे आपण जाणून घेऊया.
फ्रूट आइसक्रीम
फळांचे आइस्क्रीम बनवण्यासाठी ताजी फळे निवडा. फळे चांगली धुऊन, सोलून लहान तुकडे करा. हे फळांचे तुकडे मिक्सरमध्ये घालून प्युरी तयार करा. प्युरीत साखर किंवा मध घालून गोडसर चव द्या. दुसऱ्या भांड्यात दूध आणि क्रीम एकत्र करून फेटा. त्यात साखर आणि व्हॅनिला एसेन्स घालून चांगले मिसळा. आता फळांची प्युरी या मिश्रणात घालून एकजीव करा. हे मिश्रण साच्यात घालून फ्रीझरमध्ये ६-८ तास सेट होऊ द्या.
दुध आणि क्रीम यांचे मिश्रण तयार करा. त्यात आवडती फ्रूट प्युरी घाला. सर्व घटक चांगले मिसळून एकसंध मिश्रण बनवा. हे मिश्रण हवाबंद डब्यात ओता. डबा फ्रीजमध्ये ठेवा सेट होण्यासाठी. दर २ तासांनी एकदा काट्याने मिसळा. ही प्रक्रिया ४-५ वेळा करा. सेट झाल्यावर आईस्क्रीम सर्व्ह करा आणि वर ताजी फळे घालून सजवा.
चॉकलेट आइसक्रीम
एका भांड्यात दूध आणि मलई नीट मिसळा. हे मिश्रण मध्यम आचेवर गरम करा, पण उकळू देऊ नका. दूध आणि मलई कोमट झाल्यावर त्यात कोको पावडर घाला. कोको पावडर चांगली मिसळा जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. दुसऱ्या भांड्यात चॉकलेटचे छोटे तुकडे करा. चॉकलेट हळूहळू गरम करत वितळवा. वितळलेले चॉकलेट दूध आणि मलईच्या मिश्रणात घालून चांगले मिसळा.
सर्वप्रथम मिश्रणात साखर घाला आणि नीट ढवळा. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळत राहा. गरज असल्यास ग्राइंडरचा वापर करा. त्यानंतर त्यात व्हॅनिला एसेन्स घाला. पुन्हा एकदा संपूर्ण मिश्रण चांगले मिसळा. हे मिश्रण एका कंटेनरमध्ये ओता. कंटेनर फ्रीजरमध्ये ठेवा आणि दर ३० मिनिटांनी मिश्रण हलवा. सुमारे ४-६ तासांत चॉकलेट आइस्क्रीम तयार होईल.
Edited By - Purva Palande
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.