Shreya Maskar
उन्हाळ्यात आवर्जून मँगो आईस्क्रीम बनवा.
मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी दूध, क्रीम, आंबा प्युरी, कस्टर्ड पावडर, व्हॅनिला इसेन्स आणि साखर इत्यादी साहित्य लागते.
मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम दुधात कस्टर्ड पावडर मिसळा.
दुसरीकडे दूध गरम करून त्यात साखर विरघळू द्या.
दुधाला उकळी आल्यावर त्यात कस्टर्डचे मिश्रण टाका.
थोड्या वेळाने गॅस बंद करून त्यात आंब्याची प्युरी, आंब्याचे तुकडे, क्रीम आणि व्हॅनिला इसेन्स घाला.
हे सर्व मिश्रण एका कंटेनरमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा.
५ ते ६ तासात मँगो आईस्क्रीम तयार झाला.