Zunka Recipe : गावरान चव मिळेल फक्त १५ मिनिटांत; बनवा झणझणीत झुणका, नोट करा पारंपरिक रेसिपी

Maharashtrian Food : रोजच्या जेवणातून एखाद्या दिवशी वेगळी व्हरायटी हवी असल्यास पारंपरिक गावरान झुणका बनवा. तुमची मुलं बोटं चाटत राहतील. सोपी रेसिपी नोट करा.
Maharashtrian Food
Zunka RecipeSAAM TV
Published On

झुणका नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. झुणका भाकर महाराष्ट्राची शान आहे. गरमागरम झुणका-भाकरी खाण्याचा आनंद काही वेगळा आहे. झुणक्यात बारीक कांद्याची पात झुणक्याची चव वाढवते. झुणका भाकर हा महाराष्ट्रीयन पारंपरिक अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे. झुणका हा पदार्थ गरमागरम भाकरी सोबतच खायला छान लागतो.

झुणका हा दोन प्रकारे बनवता येतो.

गावरान झुणका रेसिपी

साहित्य

  • कांद्याची पात

  • तेल

  • जिरे

  • मोहरी

  • हिंग

  • लसूण

  • कांदा

  • बेसन

  • पाणी

  • कोथिंबीर

  • लाल तिखट मसाला

Maharashtrian Food
Bitter Gourd Pickle : कडू कारल्यापासून बनवा आंबट गोड लोणचं; रेसिपी नक्की ट्राय करून बघा, बोट चाटत रहाल

कृती

झणझणीत झुणका बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात तेल गरम करून घ्या. यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, लसूण घालून फोडणी द्या. आता या फोडणीमध्ये कांदा, लाल तिखट मसाला घालून छान मिक्स करून घ्या. तुमच्या सोयीनुसार यात बेसन घालावे आणि छान परतून एकजीव करून घ्या. थोडे पाणी झुणक्यावर शिंपडा. कांद्याची पात घालून छान मिक्स करून घ्या. झुणका छान घट्ट होत नाही तोवर शिजवा आणि ढवळत रहा. सर्वात शेवटी झुणक्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि गरमागरम भाकरीसोबत आस्वाद घ्या.

अनेकांना प्रवासातही घरी बनवलेले पदार्थ लागतात. अशात तुम्ही झटपट आणि थोडा जास्त काळ टिकेल असा झुणका प्रवासामध्ये ही खाऊ शकता. झुणका बनवताना बेसन नीट भाजल्यामुळे ॲसिडीटीची समस्या उद्भवत नाही. तसेच प्रवासात पोट देखील भरलेले राहते. यामुळे बाहेरचे खाणे टाळले जाते. जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

Maharashtrian Food
Kitchen Tips : घरी पनीर बनवलं अन् वातड झालं? वापरा 'ही' खास युक्ती, येईल रेस्टॉरंटसारखी टेस्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com