Does onion protect from heat : उन्हाळा म्हटलं की, अनेकांना चिंता वाटू लागते ती वाढत्या तापमानाची. या ऋतूमध्ये घराबाहेर पडणे कठीण होते. वाढत्या उन्हामुळे त्वचेसोबत इतर अनेक आजारही सहज उद्भवतात.
तर दुसरीकडे याच महिन्यात फळांचा राजाचे आगमन होते. या ऋतूत आंबा (Mango), कलिंगड व हायड्रेट ठेवतील अशी फळे (Fruit) प्रामुख्याने खाल्ली जातात. पण पूर्वीच्या काळी उन्हाळ्यात घराबाहेर पडताना घरातली वयस्कर माणस हातात कांदा आवर्जून देत असतं. हल्ली ही गोष्टी लोप पावताना दिसत आहे तर गावकडच्या भागात आजही कांदा खिशात ठेवला जातो.
पण कांदा खिशात ठेवण्यामागे नेमके कारण काय ? उन्हाळ्यातच कांद्याचा वापर का केला जातो ? झुणका-भाकरीसोबत खाल्ला जाणारा हा कांदा आपल्या पॉकेटमध्ये का असतो ? नेमके अज्ञान की आयुर्वेद... अशी अनेक प्रश्न तुम्हाला पडली असतील तर जाणून घेऊया त्याबद्दल
लहानपणी वाटायचे की कांदा खिशात ठेवला की कांदा उन्हाची तीव्रता स्वतःकडे ओढून घेतो मग कांदा मऊ होतो आणि माणसाला उन्हाचा त्रास होत नाही. जसे बुलेट प्रुफ जॅकेट असते तसा कांदा हीट प्रुफ आहे असा समज होता. पण कुठलेही फळ किंवा भाजी खिशात घेऊन उन्हात गेल्यावर ते मऊ पडणे स्वाभाविक आहे.
लहानपणीची एक आठवण अशी आहे की कुणाला उन्हाचा त्रास होऊन जुलाब/ ताप/ उलट्या वगैरे झाले तर कांद्याचा रस काढून तळपाय आणि हाताला चोळल्यास लगेच बरे वाटत असे, कारण कांद्यात भरपूर औषधी तत्व आहेत.
उन्हाळयात खिशात कांदा (Onion) ठेवल्याने उन्हाळी लागत नाही असे आयुर्वेदात म्हटले आहे. पण तार्किक आधारावर असे वाटते की खिशात कांदा ठेवल्याने उन्हाळी लागल्यास तत्परतेने उपाय करता येतो. खिशातून कांदा काढून, तो हाताने फोडून आणि मुठीत आवळून त्याचा रस त्या व्यक्तीच्या हाता पायावर चोळल्याने उन्हाळीचा त्रास झटकन कमी होतो. अशावेळी उन्हातून घराबाहेर पडताना काय काळजी घ्यायला हवी हे जाणून घ्या
अशी घ्याल काळजी
उन्हाळ्यात घराबाहेर (Home) जाताना घोटभर पाणी पिऊन पडावे.
डोक्यावर टोपी/ छत्री/ स्कार्फ बांधा.
खिशात छोटासा कांदा नेहेमी बाळगा, तो काही दिवसात मऊ होतो, तसे झाल्यावर तो टाकून नवीन कांदा घ्या.
उन्हातून घरी परत आल्यावर हात-पाय धुतल्यावर गुळाचा खडा खाऊन पाणी प्या.
पाणी शक्यतो साधे किंवा माठातले प्यावे.
जेवणात कच्चा कांदा नक्की खा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.