ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जास्त उष्णतेमध्ये बाष्पीभवन, घाम येणे, लघवी पुन्हा पुन्हा जाणे यासारख्या क्रियांमुळे शरीराला पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज असते.
शरीरात पाण्याची कमतरता असल्यास आणि ताप, उलट्या किंवा जुलाब झाल्यास शरीर निर्जलीकरणाच्या गंभीर अवस्थेपर्यंत पोहोचू शकते.
लघवीचा रंग जितका हलका आणि पाणचट असेल, त्याचा अर्थ तुमच्या शरीरात पुरेसे पाणी जात आहे.
जर लघवीचा रंग हलका पिवळा ते गडद पिवळा असेल तर ते डिहायड्रेशनचे लक्षण असू शकते.
उन्हाळ्यात हे ड्रिंक्स शरिराला ठेवतील थंड -
ताक
काकडीचे पाणी
मेथीचे पाणी
लिंबू आणि मिंट पाणी
सफरचंद आणि दालचिनी पाणी
द्राक्षाचे पाणी
संत्र्याचे पाणी