मांसाहारी पदार्थांची चव वाढवण्यासाठी हा सिक्रेट मसाला नक्की ट्राय करा

रेस्टॉरंटसारखा झणझणीत आणि चमचमीत मांसाहारी पदार्थ खाण्यासाठी आता बाहेर जाण्याची गरज नाही. अगदी सोप्या मसाल्यांमध्ये आणि घरच्या साहित्यात तुम्ही ढाबा किंवा हॉटेल स्टाईल मसाला घरच्या घरीच तयार करू शकता.
SECRET NON VEG MASALA RECIPE TO ELEVATE YOUR DISHES
SECRET NON VEG MASALA RECIPE TO ELEVATE YOUR DISHES saam tv
Published On: 

तुम्ही घरी चिकन, मटण, मासे किंवा अंडी शिजवत असाल, तरी अनेक महिला तक्रार करतात की सर्व मसाले घालूनही त्यांच्या मांसाहारी पदार्थांना हवा तसा स्वाद येत नाही. याचे कारण अनेकदा मसाल्यांचे योग्य मिश्रण नसणे हे असते, आणि कोणत्याही पदार्थाला चव आणण्यासाठी वरून थोडे मसाले भुरभुरणेही तितकेच आवश्यक असते.

मांसाहारी पदार्थ बनवायला खूप वेळ लागतो आणि तेलात परतलेल्या मसाल्यांचा सुगंध मांसासोबत शिजताना अनेकदा नाहीसा होतो. यामुळे खाताना त्या मसाल्यांची चव फिकी पडते आणि तुमचे मांसाहारी पदार्थ चविष्ट लागत नाहीत. अशा परिस्थितीत, हा ताजा, घरी बनवलेला मसाला वरून भुरभुरा आणि शेवटची दोन मिनिटे शिजवा. मग बघा तुमचा प्रत्येक मांसाहारी पदार्थ कसा स्वादिष्ट बनतो.

SECRET NON VEG MASALA RECIPE TO ELEVATE YOUR DISHES
Medicine Safety : मुदत संपलेली औषधं घेताय? आरोग्यासाठी ठरू शकतं अत्यंत धोकादायक

भाजी किंवा आमटीमध्ये हा फ्रेश मसाला घातल्यास जेवणाचा स्वाद आणि सुवास दोन्ही वाढतात. हा मसाला कसा तयार करायचा, हे जाणून घ्या.

साहित्य

धने, जिरे, काळी मिरी, बडीशेप, दालचिनी, लवंग, हिरवी आणि काळी वेलची, सुक्या लाल मिरच्या, तमालपत्र

SECRET NON VEG MASALA RECIPE TO ELEVATE YOUR DISHES
Bad Cholesterol: हार्ट अटॅकचा धोका कमी करतील हे 5 ड्रिंक्स; नसांमध्ये जमा झालेली चरबी काही दिवसांत वितळेल

मसाला बनवण्याची सोपी पद्धत

एका पॅनमध्ये किंवा तव्यावर मंद आचेवर हे सर्व खडे मसाले धने, जिरे, मिरी, बडीशेप, दालचिनी, लवंग, वेलची इ. हलके सुवास सुटपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत कोरडेच भाजून घ्या. लक्षात ठेवा, मसाले जळणार नाहीत याची काळजी घ्या.

थंड करणे

मसाले भाजल्यानंतर गॅस बंद करा आणि त्यांना पूर्णपणे थंड होऊ द्या.

पावडर तयार करणे

हे सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यात घ्या आणि बारीक पावडर होईपर्यंत चांगले वाटून घ्या

स्टोअर करुन ठेवा

हा घरगुती मसाला तयार झाल्यावर एका एअर टाईट डब्यात भरून ठेवा. यामुळे मसाल्याचा सुगंध दीर्घकाळ टिकून राहतो आणि तुम्ही नॉन-व्हेज पदार्थांमध्ये याचा वापर करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com