Blood Pressure : थंडीच्या दिवसात ब्लड प्रेशरला कसं ठेवाल नियंत्रणात? किचनमधील 'या' एका पदार्थाचा आहारात करा समावेश

Ginger Benefits : थंडीच्या दिवसात आपण ज्या पद्धतीने जीवनशैली जगतो, त्यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता जास्त जास्त प्रमाणात असते. त्यामुळे आपल्याला गंभीर धोका वाढण्याचा असतो.
Blood Pressure
Ginger Benefitsgoogle
Published On

थंडीच्या दिवसात आपण ज्या पद्धतीने जीवनशैली जगतो, त्यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता जास्त जास्त प्रमाणात असते. त्यामुळे आपल्याला गंभीर धोका वाढण्याचा असतो. मात्र, हिवाळ्यात असे अनेक खाद्य पदार्थ आहेत जे या समस्या कमी करू शकतात. हिवाळ्यात, कमी शारीरिक हालचाली आणि रक्तवाहिन्या अरुंद झाल्यामुळे रक्तदाब वाढतो.

विशेषत: जे लोक कामात व्यस्त असतात किंवा जास्त ताण घेतात, ज्यांची जीवनशैली बिघडलेली असते, त्यांना बीपीची समस्या इतरांपेक्षा जास्त दिसून येते. जास्त तळलेले अन्न खाणे, जंक फूड खाणे, व्यायाम न करणे, चांगली झोप न लागणे यामुळे रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत काही नैसर्गिक गोष्टींचा आहारात समावेश करा.

Blood Pressure
Chocolate Drink Benefits : कामाचा ताण घालवायचाय तर हे स्पेशल चॉकलेट ड्रिंक करेल मदत, पाहा घरच्या घरी कसं बनवाल?

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी आल्याचे सेवन करणे हे अतिशय फायदेशीर आणि आले हा नैसर्गिक पदार्थ आहे. आले सेवन केल्याने केवळ रक्तदाब नियंत्रित राहत नाही तर इतर अनेक आजार दूर होतात. हिवाळ्यात आल्याचा समावेश आहारासाठी करत राहा. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आले बीपी नॉर्मल ठेवण्यास मदत करते.

उच्च रक्तदाबामध्ये आल्याचे सेवन

आल्यामध्ये अनेक बायोएक्टिव्ह कंपाऊंड असतात. त्यामुळे रक्तदाब सामान्य ठेवण्यास मदत करतात. त्यात जिंजरॉल आणि शोगोल सारखी संयुगे आढळतात. यासोबतच यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मही आढळतात. जे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. आले खाल्ल्याने रक्तवाहिन्या शिथिल होतात आणि शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. हे सर्व घटक बीपी रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात.

अदरक कोणत्या आजारात फायदेशीर आहे?

थंडीच्या दिवसात आल्याचे सेवन अवश्य करावे. अद्रकामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात जे शरीराच्या कोणत्याही भागाची सूज कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात. आले खाल्ल्याने शरीर डिटॉक्स होते. सांधे आणि स्नायू दुखत असतील तर आल्याचे सेवन फायदेशीर मानले जाते. आले हे सर्दी आणि खोकल्यावर रामबाण उपाय आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर त्यासाठीही आल्याचे सेवन फायदेशीर मानले जाते. आले खाल्ल्याने व्हायरल आणि सीजनल इन्फेक्शनचा धोका टाळता येतो.

Blood Pressure
Health Risks : MRI करण्याआधी 'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, नाहीतर पडेल महागात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com