

लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा काल करण्यात आली. देशातील नवीन सरकार बनवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी मतदान करणं आवश्यक आहे. मतदान करण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक कागदपत्र असणं गरजेचे आहे. मतदान करताना तुम्हाला मतदार ओळखपत्र आवश्यक असते. जर तुमचे मतदार ओळखपत्र हरवले असेल तर आता काळजी करू नका. तुम्ही डुप्लिकेट कार्डसाठीही अर्ज करू शकता. (Latest Marathi News)
जर तुमचं कार्ड फाटलं असेल त्याला व्यवस्थित करण्यासाठी अर्ज करू शकतात. जर मतदान कार्ड हरवलं असेल तर डुप्लिकेट कार्डसाठी अर्ज करू शकतात. जर मतदान कार्ड चोरीला गेले असेल तर तुम्ही डुप्लिकेट कार्ड मिळवू शकतात.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
डुप्लिकेट मतदार ओळखपत्र मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या राज्याच्या मुख्य निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर जाऊन फॉर्म भरावा लागेल.
त्यानंतर EPIC-002ची एक कॉपी डाऊलोड करावं.
दरम्यान हा फार्म भरताना काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
फॉर्मसोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडण्यासारखी विशेष काळजी घ्यावी.
फॉर्ममध्ये तुम्हाला डुप्लिकेट ओळखपत्र बनवण्याचे कारणही द्यावे लागेल.
तुमचे मतदार ओळखपत्र हरवले किंवा चोरीला गेल्यास तुम्हाला एफआयआरची प्रत फॉर्मसोबत जोडावी लागेल.
या कागदपत्रांमध्ये पासपोर्ट आकाराचा फोटो, पत्ता आणि ओळखीचा पुरावा देणारे असावे.
यानंतर हा फॉर्म तुमच्या स्थानिक निवडणूक अधिकाऱ्याकडे सबमिट करा.
त्यानंतर एक संदर्भ क्रमांक दिला जाईल. या क्रमांकाच्या मदतीने तुम्ही राज्य निवडणूक कार्यालयाच्या वेबसाइटवर जाऊन तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता.
म्हणजेच या क्रमांकाचा वापर करून तुम्ही तुमचे मतदार ओळखपत्र बनले आहे की नाही हे जाणून घेऊ शकता.
एकदा तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट केल्यानंतर प्रथम त्याची पडताळणी केली जाते, त्यानंतर डुप्लिकेट कार्डची प्रक्रिया सुरू होते.
पडताळणीनंतर तुम्हाला कळवले जाईल. यानंतर तुम्ही स्थानिक निवडणूक अधिकाऱ्याकडे जाऊन तुमचे डुप्लिकेट मतदार ओळखपत्र घेऊ शकतात.
जेव्हा तुम्ही नवीन व्होटर आयडी कार्ड बनवतो त्याची प्रोसेस दीर्घकाळ चालणारी आहे.
परंतु डुप्लिकेट कार्डची प्रत मिळवणे त्यापेक्षा खूप सोपे आहे.
यास जास्त वेळ लागत नाही आणि कुठेही जाण्याची गरज नाही.
तुम्ही डुप्लिकेट मतदार ओळखपत्रासाठी घरी बसून अर्ज करू शकता कारण भारतीय निवडणूक आयोगाने आता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये डुप्लिकेट मतदार ओळखपत्रासाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.