2022 साली 'ओपनएआय'चं चॅटजीपीटी हे युजर्ससाठी खुलं करण्यात आलं. या एआय प्लॅटफॉर्मची जगभरात चर्चा सुरू आहे. त्यानंतर २०२३ साली एआयचे अनेक प्लॅटफॉर्म समोर आले आहेत. याच काही एआय अॅप्स आणि साईटच्या मदतीने अनेक कामे करता येऊ शकतात. (Latest Marathi News)
एआय अॅप्सच्या मदतीने म्युझिक देखील तयार करू शकता. एआयच्या मदतीने आता सहज शक्य झालं आहे. एआयचे काही प्लॅटफॉर्म फ्री आहेत. तर काही प्लॅटफॉर्मचा वापर करण्यासाठी सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
चॅटजीपीटी एआयचं जगातील सर्वाधिक प्रसिद्ध अॅप आहे. चॅटजीपीटीच्या माध्यमातून तुम्ही कविता किंवा एखादा लेखही लिहू शकता. कोडिंगसाठीही हे अॅप मदतशीर आहे. लिखाणातील कोणतंही अवघड काम एआयच्या मदतीने सोपे होऊ शकतं.
हे गुगलचं एआय प्लॅटफॉर्म आहे. YouTube, Maps, Hotels, Flights, Gmail, Docs आणि Drive सारखे अॅप्सकडून मदत घेऊन बार्ड माहिती मिळवून देतो. तसेच लेख लिहिणे, फोटो तयार करण्यासाठी गुगल बार्डची मदत मिळते.
हे मायक्रोसॉफ्टचं एआय प्लॅटफॉर्म आहे. या एआय अॅपच्या मदतीने वेब ब्राऊझिंगशिवाय मजकूर लिहिणे, फोटो तयार करणे सारखे काम करणे सोपे झाले आहे. या अॅप्सची मदत घेऊन फोटो तयार करण्यासाठी टेक्स्ट बेस्ड प्रॉम्प्ट द्यावं लागतं.
हे म्युझिक तयार करणारं एआय प्लॅटफॉर्म आहे. या एआय अॅप्सच्या मदतीने म्युझिक आणि साऊंडट्रॅक तयार करू शकता. म्युझिक तयार करण्यासाठी युजर्सला टेक्स्ट प्रॉम्प्ट द्यावं लागतं.
अॅनिमेशन व्हिडिओ तयार करण्यासाठी आता तासंतास वाया घालवण्याची गरज नाही. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने अॅनिमेशन व्हिडिओ तयार करण्यासाठी फक्त डिस्क्रिप्शन द्यावे लागले. तसेच व्हिडिओ तयार करण्यासाठी 'टोन' आणि 'गाण्याचा अवधी' सांगणं गरजेचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.