Fake App कसे ओळखाल? Hacking आणि Scamming पासून वाचण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

Cyber Scam : हल्ली डीप फेक, एआय आणि वाढत्या तंत्रज्ञानामुळे फेक अॅपच्या जाळ्यात आपण सहज अडकतो. लोकांची वैयक्तिक माहिती गोळा करण्यासाठी आणि डिव्हाइसला हानी पोहोचवण्यासाठी काही बनावट अॅप्स विकसित केले जातात.
Fake App
Fake App Saam tv
Published On

How To Spot Fake App :

हल्ली डीप फेक, एआय आणि वाढत्या तंत्रज्ञानामुळे फेक अॅपच्या जाळ्यात आपण सहज अडकतो. लोकांची वैयक्तिक माहिती गोळा करण्यासाठी आणि डिव्हाइसला हानी पोहोचवण्यासाठी काही बनावट अॅप्स विकसित केले जातात.

सध्या अनेकांची फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार मोठ्या प्रमाणावर वापर करतात. ज्यामुळे स्कॅमिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. तुम्ही जे अॅप्स सहजपणे इन्स्टॉल करता ते तुमचा वैयक्तित डेटा हॅक करतात ज्यामुळे तुमची पर्सनल माहिती त्यांच्या पर्यंत पोहोचते.

अनेक अॅप्समध्ये Google play Store सारख्या प्रसिद्ध अॅप्स (Application) स्टोअरवर देखील अपलोड केले जातात. सुरुवातीला आपल्यालाकडून ते सगळी माहिती काढून घेतात नंतर हे अॅप्स आपली वैयक्तिक माहिती चोरून फ्रॉड (Fraud) करतात. परंतु हे बनावट अॅप्स ओळखायचे कसे जाणून घेऊया.

Fake App
Paytm कडून पुन्हा कर्मचारी कपात! १००० हून अधिक लोकांना दाखवला थेट घरचा रस्ता

1. रिव्ह्यू तपासा

कोणतेही अॅप मोबाईलमध्ये डाउनलोड करताना त्याचा रिव्ह्यू तपासा. तसेच त्या अॅपबद्दल कमेंटदेखील केल्या असतात. बरेचदा चांगला रिव्ह्यू असणारे अॅप देखील वैयक्तिक माहीती (Information) चोरू शकतात.

2. चुकीची माहिती

बरेचदा अॅप तयार केल्यानंतर त्याच्या प्रसिद्धीसाठी चुकीची माहिती युजर्सपर्यंत पोहोचवली जाते. तसेच त्याचा पेजवर व्याकरण किंवा स्पेलिंगच्या चुका सापडणार नाही. तसेच यामध्ये टायपिंग, एरर, व्याकरण किंवा स्पेलिंग चूक दिसल्यास सावध व्हा.

3. किती लोकांना डाउनलोड केले?

बरेदसे अॅप हे जगभरात डाउनलोड केले जातात. त्यांच्या डाउनलोडची संख्या लाखात, कोटींमध्ये असू शकते. पण काही लोकप्रिय असणारे अॅप हे फक्त हजारात डाउनलोड केलेले असेल तर ते फसवे असू शकते याची नोंद घ्या.

Fake App
GPay, PhonePe आणि Paytm वरुन Transaction होणार लवकरच बंद, लगेच करा हे काम; अन्यथा...

4. डेव्हलपर

गुगल प्ले स्टोअरवर अॅप डेव्हलपरचे नाव आणि संबंधित माहिती देते. बरेचदा फ्रॉड करणारे बनावट नावाने अॅप्स अपलोड करुन तुमचा वैयक्तिक डेटा चोरण्याचा प्रयत्न करतात.

5. तारीख

अॅप कधी रिलीज झाला? ही गोष्ट ओळखण्यातही मदत करु शकते. जर अॅप नुकतेच रिलीझ झाले असेल आणि डाउनलोडची संख्या अधिक असेल तर तुमच्यासोबत फ्रॉड होऊ शकतो. यासाठी कोणतेही अॅप डाउनलोड करताना त्याची काळजी घ्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com