Hill Stations:नोव्हेंबर महिन्यात हिल स्टेशनला जायचयं? तर 'या' ठिकाणाला नक्की भेट द्या

travel: हिवाळा ऋतू प्रवासासाठी उत्तम काळ आहे. या हंगामात, लोकांना हिल स्टेशनला भेट द्यायला आवडते.
Hill Stations
Hill StationSaam Tv
Published On

हिवाळा ऋतू प्रवासासाठी उत्तम काळ आहे. या हंगामात, लोकांना हिल स्टेशनला भेट द्यायला आवडते कारण या काळात पर्वतांवर पांढरे बर्फ आणि हिरव्यागार उंच शिखरांची अद्भुत नैसर्गिक दृश्ये पाहता येतात. प्रवास करण्यासाठी आपल्याला वेळ आणि पैसा आवश्यक आहे. पण जर तुम्ही तुमच्या सहलीचे नीट नियोजन केले तर तुम्हाला सुट्टीचा जास्त आनंद घेता येईल.

हिल स्टेशनला भेट देण्यासाठी नोव्हेंबर महिना योग्य आहे. या महिन्यात फारशी थंडी नसते. जर तुम्हाला दोन ते तीन दिवसांची सुट्टी मिळत असेल तर तुम्ही फिरायला हिल स्टेशनवर जाऊ शकता. तुम्ही फक्त २ ते ३ हजार रुपयांमध्ये हिल स्टेशनला भेट देऊ शकता. नोव्हेंबर महिन्यात कमी बजेट मध्ये भेट देण्याच्या सुंदर हिल स्टेशन मसुरीबद्दल जाणून घेऊया.

Hill Stations
Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

मसुरी

दिल्लीच्या आजूबाजूला अनेक हिल स्टेशन्स आहेत, जिथे तुम्ही वीकेंड ट्रिपला किंवा दोन दिवसांच्या सुट्टीवर जाऊ शकता. जर तुमच्याकडे प्रवास करण्यासाठी दोन ते तीन दिवस असतील तर तुम्ही मसुरीला भेट देऊ शकता. मसुरीला डोंगरांची राणी म्हणतात. मसुरी हे शिमला मनालीपेक्षा स्वस्त आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. येथे अनेक उत्कृष्ट पर्यटन स्थळे आहेत. तुम्हाला दिल्ली-गाझियाबाद रेल्वे स्टेशनवरून डेहराडूनसाठी ट्रेन मिळेल. तुम्ही स्लीपर क्लासमध्ये ट्रेनचे तिकीट ३०० रुपयांच्या आत बुक करू शकता. डेहराडून रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यानंतर, तुम्ही बसने मसुरीला जाऊ शकता, ज्याचे भाडे सुमारे १०० रुपये आहे.

मसुरीमध्ये मॉल रोडपासून एक किंवा दोन किमी अंतरावर तुम्ही होम स्टे बुक करू शकता. ५०० ते हजार रुपयांत चांगली खोली मिळेल.  फिरण्यासाठी तुम्ही स्कूटर बुक करू शकता. तुम्हाला दररोज ५०० रुपयांची स्कूटर मिळेल, ज्याद्वारे तुम्ही जवळपासच्या पर्यटन स्थळांच्या फेरफटका मारू शकता. तुम्ही दोन दिवसात जेवणासाठी १००० रुपये खर्च करू शकता. दिल्ली ते डेहराडूनसाठी रात्रीची ट्रेन निवडा. तुम्ही सकाळी ६ च्या सुमारास डेहराडूनला पोहोचाल. तिथून मसुरीचा प्रवास दीड तासाचा आहे. मसुरीमध्ये हॉटेल किंवा होम स्टेमध्ये सकाळी चेक इन करा.

हॅपी व्हॅलीपासून सुरुवात करू शकता. नंतर बुद्ध मंदिर, दलाई हिल्स नावाची जागा आहे. एक किलोमीटरचा ट्रेक करून तुम्ही टेकडीच्या माथ्यावर पोहोचू शकता आणि येथून सुंदर दृश्ये पाहू शकता. दोन तासांत दलाई हिल्सला भेट दिल्यानंतर, खाली येऊन केम्प्टी फॉल्ससाठी जाऊ शकता. हॅपी व्हॅलीपासून केम्पटी फॉल्स सुमारे १३ ते १४ किलोमीटर अंतरावर आहे. पार्किंगमधून तुम्ही पायी किंवा रोप वेने धबधब्यापर्यंत जाऊ शकता.

दुसऱ्या दिवशी सकाळी मसुरीपासून ५० ते ६० किमी अंतरावर असलेल्या धनौल्टीसाठी जाऊ शकता. वाटेत तुम्ही अनेक व्ह्यू पॉइंट्स आणि बर्फाच्छादित पर्वत पाहू शकता. धनौल्टी येथील इको पार्कचे तिकीट ५० रुपये आहे, जिथे तुम्ही सुंदर दृश्ये, हिरवळ आणि लहान मुलांसाठी झुलण्याचा आनंद घेऊ शकता.

धनौल्टीहून परताना सुरकंडा माता मंदिरात जा. हे मंदिर एका टेकडीवर आहे, जिथे तुम्ही पायी चढून जाऊ शकता किंवा २०५ रुपयांचे तिकीट घेऊन रोपवे सुविधेचा आनंद घेऊ शकता. तिथे खूप थंडी असल्यामुळे स्कार्फ, टोपी आणि उबदार कपडे सोबत ठेवा.

Hill Stations
Crispy Momos: संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा स्ट्रीट स्टाइल क्रिस्पी मोमोज, नोट करा रेसिपी

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com