Late Night Food: रात्रीचे जेवण किती वाजता करावे? उशिरा जेवण्याची सवयीमुळे आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम!

Late night Food: रात्री उशिरा जेवण्याची सवय आरोग्यासाठी ठरू शकते हानिकारक. पचन, वजन, झोप आणि हृदयावर होणारे परिणाम जाणून घ्या. रात्रीचे जेवण किती वाजता करावे, हेही समजून घ्या.
Late Night Food
Late Night FoodSaam Tv
Published On: 

Late Night Food: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकजण कामाच्या व्यापामुळे रात्री उशिरा जेवतात. काहींना तर रात्री १० ते ११ वाजल्यानंतर जेवण्याची सवय असते. मात्र, रोजची ही सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. आपण दिवसभरात काय खातो, यासोबतच कोणत्या वेळी खातो, हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रात्री उशिरा जेवण्याचा परिणाम शरीराच्या जैविक घड्याळावर होऊ शकतो. यामुळे पचनक्रिया, झोप आणि वजनावर परिणाम होण्याची शकतो. त्यामुळे रात्रीचे जेवण योग्य वेळी घेणे आवश्यक आहे. जाणून घेऊया रात्री उशिरा जेवण्याचे शरीरावर होणारे ७ दुष्परिणाम.

वजन वाढण्याची शक्यता

रात्री उशिरा जेवण्याची सवय असल्यास पचनसंस्थेला पुरेशी विश्रांती मिळत नाही. विशेषतः रात्री जड आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने पचनाचा त्रास होऊ शकतो. यामुळे गॅस, अपचन, पोट फुगणे आणि ॲसिडिटी यांसारखे त्रास जाणवू शकतात. रात्री उशिरा जेवल्यानंतर लगेच झोपण्याची सवय अनेकांना असते. अशा वेळी शरीराच्या पचन प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. रात्री अतिरिक्त कॅलरीज घेतल्यास वजन वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

Late Night Food
DIY Floor Cleaning Tool: वाकून फरशी पुसताना कंबर दुखतेय? मग वापरा हा २ मिनिटांत तयार होणारा मॉप, उभ्यानेच होईल सफाई

रक्तातील साखर वाढते

रात्री भरपेट जेवून लगेच झोपल्यास पचनसंस्था सक्रिय राहते. त्यामुळे काही लोकांना अस्वस्थता, ॲसिड रिफ्लक्स आणि झोपेत अडथळे जाणवू शकतात. परिणामी, दुसऱ्या दिवशी थकवा आणि चिडचिड होऊ शकते. रात्री उशिरा जेवणे शरीराच्या इन्सुलिन प्रतिसादावर परिणाम करू शकते. विशेषतः कर्बोदके आणि साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. दीर्घकाळ अशी सवय राहिल्यास चयापचयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढू शकतो.

Late Night Food
Hair Care: थंडीत केस ड्राय आणि डल होतात? आठवड्यातून एकदा लावा हा घरगुती हेअर मास्क केस होतील मऊ आणि चमकदार

हृदयाच्या आरोग्यावर परिणाम

रात्री उशिरा जेवण्याची सवयीमुळे वजन वाढणे, ट्रायग्लिसराइड्स आणि खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणे यांसारखे घटक हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. आपल्या शरीराचे एक नैसर्गिक जैविक घड्याळ असते. त्यानुसार झोप, भूक, हार्मोन्स आणि पचनक्रिया नियंत्रित होतात. रात्री सतत उशिरा जेवल्यामुळे या नैसर्गिक चक्रावर परिणाम होऊ शकतो. रात्री योग्य झोप न मिळाल्यास दुसऱ्या दिवशी शरीरात उत्साह राहत नाही. सतत थकवा जाणवणे, कामात लक्ष न लागणे आणि एकाग्रता कमी होणे अशा समस्या उद्भवू शकतात.

रात्रीचे जेवण किती वाजता करावे?

रात्री नेहमी ७ ते ८ वाजताच्या दरम्यान जेवण करावे. निरोगी राहण्यासाठी रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान २ ते ३ तास आधी घेण्याचा प्रयत्न करा. रात्रीचा आहार हलका आणि पचायला सोपा असावा. जेवल्यानंतर लगेच झोपू नका. त्याऐवजी १० ते १५ मिनिटे हलके चालावे. तसेच दररोज ठराविक वेळी जेवण्याची सवय लावा. यामुळे पचनक्रिया आणि झोपेचे चक्र व्यवस्थित ठेवण्यास मदत होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.