Hair Care: थंडीत केस ड्राय आणि डल होतात? आठवड्यातून एकदा लावा हा घरगुती हेअर मास्क केस होतील मऊ आणि चमकदार

Shruti Vilas Kadam

केसांचा कोरडेपणा कमी होतो

खोबरेल तेलामुळे केस मऊ राहण्यास मदत होते. कोरफड लावल्याने केसांना ओलावा मिळतो. त्यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होऊ शकतो.

Hair Care

केसांना येते चमक

केस निस्तेज आणि राठ झाले असतील तर खोबरेल तेल आणि कोरफड लावू शकता. यामुळे केस मऊ होतात आणि त्यांना नैसर्गिक चमक मिळण्यास मदत होते.

Hair Care | Saam TV

टाळूचा कोरडेपणा कमी होतो

टाळू कोरडी असल्यामुळे खाज येत असेल तर कोरफड लावू शकता. कोरफड टाळूला थंडावा देते. खोबरेल तेलामुळेही कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.

Hair Care | Saam tv

केस तुटणे कमी होऊ शकते

केस खूप कोरडे असतील तर ते लवकर तुटतात. अशावेळी खोबरेल तेल लावल्याने केसांचे संरक्षण होण्यास मदत होते. कोरफड लावल्याने केस मऊ राहतात.

Hair Care | Saam tv

केस मऊ आणि मुलायम होतात

खोबरेल तेल आणि कोरफड एकत्र लावल्याने केसांचा राठपणा कमी होऊ शकतो. त्यामुळे केस विंचरणे सोपे जाते आणि ते अधिक मऊ वाटतात.

Hair Care:

खोबरेल तेल आणि कोरफड कसे लावावे?

एका वाटीत दोन चमचे कोरफडीचा गर आणि एक चमचा खोबरेल तेल घ्या. दोन्ही एकत्र करून मिश्रण तयार करा. हे मिश्रण केसांना आणि टाळूला हलक्या हाताने लावा.

Hair Care | Saam Tv

हे मिश्रण किती वेळ लावून ठेवावे?

खोबरेल तेल आणि कोरफडीचे मिश्रण केसांना २० ते ३० मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर शाम्पूने केस धुवा. आठवड्यातून एकदा हा उपाय करू शकता. पहिल्यांदा वापरण्यापूर्वी थोडे मिश्रण हातावर लावून तपासा. खाज किंवा जळजळ झाल्यास वापर करू नका.

Hair care | Saam Tv

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Hair Care

Walnut Brownie Recipe: लहान मुलांसाठी घरीच झटपट बनवा चॉकलेट आणि अक्रोडाची स्वादिष्ट ब्राउनी, वाचा सोपी रेसिपी

Walnut Brownie Recipe | saam TV
येथे क्लिक करा