Fake Voting: एका व्यक्तीकडे २ ओळखपत्र असल्यास होऊ शकतो तुरूंगवास; मतदार ओळखपत्र रद्द करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

Voter ID Card Cancellation Process: दोन ठिकाणच्या मतदार यादीत तुमचंही नाव आलंय का? तर मोठी किंमत मोजावी लागू शकते. कायदेशीर प्रक्रियेनुसार तुरुंगातही पाठवले जाऊ शकते. त्यामुळे मतदार ओळखपत्र रद्द करण्याची प्रक्रिया जाणून घेऊ या.
Voter ID Card
Voter ID Card Yandex

पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलपासून सुरू होत आहे. या दिवशी 102 जागांसा्ठी मतदान होणार आहे. या परिस्थितीत बनावट मतदान (Fake Voting) रोखण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. भारतात असे अनेक लोक आहेत, ज्यांची नावे दोन वेगवेगळ्या मतदार याद्यांमध्ये समाविष्ट आहेत. तसे असल्यास ते त्वरित रद्द करा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. एवढंच नाही तर तुरुंगातही जाऊ शकते.

अनेकांना त्यांच्या कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या पत्त्यांवरून बनवलेले मतदार ओळखपत्र मिळते. एखादी व्यक्ती एखाद्या ठिकाणी राहत असेल, तर त्याला त्या जागेसाठी बनवलेले मतदार (Voter ID Card Cancellation Process) ओळखपत्र मिळते. तीच व्यक्ती नंतर नोकरी किंवा इतर कारणामुळे दुसऱ्या ठिकाणी जाते. त्यानंतर त्या व्यक्तीला पहिले मतदार ओळखपत्र रद्द न करता दुसऱ्या ठिकाणाहून बनवलेले मतदार ओळखपत्र मिळते. अशा परिस्थितीत दोन्ही ठिकाणच्या मतदार यादीत एकाच व्यक्तीचे नाव असते. अशा स्थितीत त्या व्यक्तीने दोन्ही ठिकाणांहून मतदान केले, तर त्याला बनावट मतदान म्हटलं जाईल. बनावट मतदान केल्यामुळे त्या वक्तीवर कारवाई देखील होऊ (Voter ID Card) शकते.

बनावट मतदान थांबविण्यासाठी निवडणूक आयोगाने पाऊल उचलले आहे. बनावट मतदान रोखण्यासाठी आणि बनावट मतदार कार्ड ओळखण्यासाठी निवडणूक आयोगाने आधार कार्डशी मतदार कार्ड (Voter ID) लिंक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आता एका व्यक्तीचे एकच मतदार ओळखपत्र आधारशी लिंक केले जाणार आहे. तुमचेही आधारकार्ड आजच मतदार कार्डशी लिंक करून घ्या.

एका व्यक्तीकडे दोन मतदार ओळखपत्रे असल्यास शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. निवडणुकीपूर्वी सरकार (election commision) लोकांना त्यांचे मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्यास सांगत आहे. यानंतर कोणाकडे दोन मतदार ओळखपत्रे आढळून आल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कायदेशीर प्रक्रियेनुसार त्याला 1 वर्षाच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.

Voter ID Card
Vote from Home: ज्येष्ठ नागरिकांना घरातून मतदान उपक्रमाद्वारे मतदानाची सुविधा देणार: मुख्य निवडणूक अधिकारी

मतदार ओळखपत्र रद्द करण्यासाठी पुढील प्रक्रिया करा. एकाच मतदाराकडे दोन मतदार ओळखपत्रे असल्यास, त्यापैकी एक कार्ड रद्द करण्यासाठी फॉर्म 7 भरून सबमिट करावा (lok sabha) लागेल. मतदाराला हा फॉर्म ऑनलाइन किंवा जवळच्या निवडणूक कार्यालयातून घेता येणार आहे.

फॉर्ममध्ये, मतदार यादीतून आपले नाव रद्द करण्यासाठी आणि त्यावर स्वाक्षरी करण्यासाठी (election) आवश्यक तपशील भरावे लागतील. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याकडे फॉर्म जमा करावा लागेल. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास तुम्ही फॉर्म भरून संबंधित अधिकाऱ्याला पोस्टाद्वारे पाठवू शकता.

Voter ID Card
Lok Sabha Election: घरून कसे कराल मतदान? जाणून घ्या Vote From Homeची प्रक्रिया आणि पात्रता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com