अलिकडच्या धावपळीच्या जगात महिलांना स्वतःवर लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे शरीराच्या अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते. आजकाल महिलांमध्ये पीसीओएसचे प्रमाण वाढत जात आहे. ही एक हार्मोनल समस्या आहे.
पीओसीएस म्हणजे 'पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम' होय. यामागे बदलती जीवनशैली, ताणतणाव, आहाराचा अभाव अशी असंख्य कारणे आहेत. मासिक पाळी सुरळीत नसणे, गर्भधारणेत अडथळे, वजन वाढणे ही पीसीओएसची लक्षणे आहेत. पीसीओएसला काही घरगुती उपायांनी तुम्ही नियंत्रणात आणू शकता.
पौष्टिक आहार
पीसीओएसची समस्या असलेल्या महिलांनी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जंक फूड टाळून घरी बनवलेले गरमागरम पदार्थांचा आस्वाद घ्यावा. प्रक्रियायुक्त पदार्थांचे सेवन टाळा. तसेच सकाळी गरम पाण्यात लिंबू टाकून प्या. त्यामुळे शरीराला डिटॉक्स होण्यासोबत त्याला उर्जाही मिळेल. बीट आणि गाजरचा रस रोज प्या. यामुळे रक्त शुद्ध होऊन अशक्तपणा दूर होतो. सोया मिल्क इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढवते. त्यामुळे नियमित सोया मिल्क प्यावे. तसेच हे कोलेस्ट्रॉल देखील कमी करते.
आरोग्याची काळजी
पीसीओएसची समस्या असलेल्या महिलांनी जास्तीत जास्त आपल्या शरीराची हालचाल करावी. शरीराला गती द्यावी. एकाच जागी तासनतास बसून राहू नये. पीसीओएसची समस्या असल्यास महिलेने मद्यपान आणि धुम्रपान टाळावे. या महिलांना प्लास्टिकच्या भांड्यातून अन्न पदार्थ खाऊ नये. कारण प्लास्टिक बनवण्यासाठी वापरण्यात येणारी रसायने आरोग्यास घातक असतात. यामुळे शरीराचे हार्मोन्स असंतुलित होतात.
घरगुती उपाय
दालचिनी
एका ग्लासमध्ये कोमट पाणी, काळे मनुके, दालचिनी आणि मेथी दाणे रात्रभर भिजवून सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल. कारण दालचिनीमध्ये इन्सुलिन प्रतिरोधक गुणधर्म आहेत. तर काळे मनुके खाल्ल्यास रक्त शुद्ध होते.
कोरफड
कोरफड पचन सुरळीत करण्यास मदत करते. पीसीओएसने ग्रस्त महिलेने कोरफडीचा गर पाण्यात टाकून प्यावा. यात चवीनुसार मीठ आणि मध घालावे.
अश्वगंधा
अश्वगंधा ही पीसीओएसवर रामबाण उपाय आहे. कोमट पाण्यात अश्वगंधा पावडर मिसळा आणि रात्री झोपण्याआधी याचे सेवन करा.
शतावरी
शतावरी स्त्रियांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. एका ग्लासात कोमट दूध आणि शतावरी पावडर मिसळा. रोज सकाळी हे पाणी प्यावे.
डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.