Health Care Tips
Corn Starch Side EffectsSAAM TV

Corn Starch Side Effects : जेवणात कॉर्न स्टार्च घालताय? वेळीच सावध व्हा! तुम्ही आजारांना देताय आमंत्रण

Health Care Tips : जेवणात वापरले जाणारे कॉर्न स्टार्च आरोग्यासाठी घातक आहे. कॉर्न स्टार्चमुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. कॉर्न स्टार्चमुळे शरीराला होणार नुकसान जाणून घ्या.
Published on

आपण आपल्या रोजच्या जेवणात कॉर्न स्टार्च चा वापर करतो. मंचुरियन ,नूडल्स ,सूप असे अनेक पदार्थ आपण घरी बनवत असतो. या पदार्थांची चव वाढवण्यासाठी त्यात आपण कॉर्न स्टार्च घालतो. पदार्थांचा थिकनेस वाढवायला, पदार्थ घट्ट करायला कॉर्न स्टार्चचा वापर होतो. लहान मुलांमध्ये हे पदार्थ खाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होताना दिसतो. तसेच लहान मुलांची रोग प्रतिकारशक्ती देखील कमी असते.

कॉर्न फ्लोर आणि कॉर्न स्टार्च हे दोन्ही वेगवेगळे पदार्थ आहेत.

कॉर्न फ्लोर आणि कॉर्न स्टार्च मधील फरक

कॉर्न फ्लोर

कॉर्न फ्लोर बनवण्यासाठी मक्याचे दाणे सुकवून त्यांची पावडर केली जाते. कॉर्न फ्लोरमुळे हाडे मजबूत होतात. कारण यात लोह अधिक प्रमाणात असते.

कॉर्न स्टार्च

कॉर्न स्टार्च हे प्रक्रियायुक्त पदार्थ आहे. जो पांढऱ्या पिष्टमय एंडोस्पर्मपासून बनवला आहे. यामुळे मक्याचे पौष्टिक तत्व निघून जातात.

कसा बनवला जातो कॉर्न स्टार्च ?

कॉर्न स्टार्च बनवण्यासाठी मक्यावर प्रक्रिया केली जाते. ज्यामुळे त्यात कॅलरीजचे प्रमाण वाढते. एक कप कॉर्न स्टार्चमध्ये अधिक प्रमाणात कॅलरी आणि कार्ब असतात. ह्यामुळेच जीवनसत्त्वे आणि प्रथिनांची पातळी कमी होऊ लागते. त्यामुळे जेवणात कॉर्न स्टार्च चा वापर टाळावा.

Health Care Tips
Heart Health Tips : मधुमेह आणि बीपीचा त्रास्त आठवडाभरात होईल गायब; आजपासूनच आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा

मधुमेह

कॉर्न स्टार्च चा जेवणात जास्त प्रमाणात वापर केल्याने रक्तातील सारखरेच प्रमाण वाढते. त्यामुळे टाईप २ मधुमेहाचा धोका वाढतो.

हृदयाचे आरोग्य

कॉर्न स्टार्च मधील रिफाईंड कार्ब हृदयासाठी हानिकारक असतात. यामुळे हृदयरोग, स्ट्रोक या समस्या उद्भवतात.

वजन वाढते

कॉर्न स्टार्च मध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असल्यामुळे झपाट्याने वजन वाढते. त्यामुळे लवकर लठ्ठपणा येतो. कॉर्न स्टार्च मधील कार्बोहाइड्रेट शरीराला धोका पोहोचवतात.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health Care Tips
Rising Early Morning : पहाटे लवकर उठण्याचा कंटाळा येतो? मग 'या' टिप्सने चुटकीसरशी जाग येईल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com