Healthy Food: पोहे की भात? आरोग्यासाठी काय आहे अधिक फायदेशीर? जाणून घ्या

Pohe Vs Rice: पोहे भारतात सर्वाधिक खाल्ला जाणारा पदार्थ आहे.
Healthy Food
Healthy FoodSaam tv
Published On

New Delhi: पोहे भारतात सर्वाधिक खाल्ला जाणारा पदार्थ आहे. भारतात पोहे आवडीने खाल्ला जातात. पोहे पचायला देखील हलके असतात. त्यामुळे पोहे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. दुसरीकडे भात खाल्याने लठ्ठपणा आणि शरिरात साखरेचं प्रमाण वाढतं अशी समज लोकांमध्ये आहे. आरोग्यासाठी नेमकं पोहे की भात फायदेशीर आहे, हे जाणून घेऊयात. (Latest Marathi News)

आरोग्य तज्ञ्जांच्या माहितीनुसार, पोह्यांमध्ये भाताच्या तुलनेत कॅलरीचं प्रमाण कमी असतं. तसेच पोह्यांमध्ये फायबर देखील अधिक असतं. त्यामुळे पोहे पौष्टिक असतात. तुम्हाला पोहे आणि भात असे दोन्ही पदार्थ खायला आवडत असेल. तर जाणून घेऊयात की, या दोन्ही पदार्थामध्ये न्यूट्रिशनलमध्ये किती फरक आहे, जाणून घेऊयात. (Food)

Healthy Food
Khandeshi Masala Khichdi Recipe: झणझणीत खान्देशी मसाला खिचडी बनवायची आहे? जाणून घ्या सोपी पद्धत

पोह्यांमध्ये फायबरचं प्रमाण अधिक असते. फायबर हे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतं. फायबर पचनासाठी चांगलं असतं. पोह्यांमध्ये लोह दखील अधिक प्रमाणात असतं. पोहे खाल्यास पोट भरल्या सारखं वाटतं. पोह्यांनी वजन देखील वाढत नाही. त्यामुळे पोह्यांना पौष्टिक मानलं जातं.

पोह्यांमध्ये फायबर अधिक असतं

पोह्यांमध्ये भाताच्या तुलनेत फायबर अधिक असते. त्यामुळे पोहे पचनास हलके असतात. तर भूक भागविण्यासाठी पोहे चांगले आहत. पोह्यांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

Healthy Food
Khandeshi Varan Batti Recipe: खान्देशी वरण बट्टी बनवायची आहे? जाणून घ्या सोपी पद्धत

पोहे बनवणे खूपच सोपे

न्याहारीसाठी पोहे बनविणे हे भात बनविण्यापेक्षा सोपे आहे. न्याहारीत पोहे खायला अनेकांना आवडतात. पोहे बनविण्यास अधिक वेळ लागत नाही. त्यामुळे पटकन पोहे बनवून भूक भागवता येते. पोहे बनविताना त्यात वाटाणे टाकू शकतात. वाटाणे टाकल्यास पोहे अधिक रुचकर होतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com