Vishal Gangurde
खान्देशी मसाला खिचडी बनविण्यासाठी तांदूळ, तूर डाळ स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवावे.
मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, लसूण पाकळ्या, आले फिरवून घ्यावे. त्याची जाडसर भरड करावी
कुकरमध्ये तेल ओतल्यानंतर मोहरी, जिरे, कढीपत्ता, चिरलेला कांदा, कोथिंबीर, लसूण पाकळ्या, आले याची जाडसर भरड एकजीव करून घ्या.
त्यानंतर त्यात हिंग, हळद, खोबऱ्याचे तुकडे, शेंगदाणे, लाल तिखट, चवीनुसार मीठ, बटाट्याच्या फोडी घालाव्यात.
यानंतर यात भिजवून ठेवलेले तांदूळ व तूर डाळ एकत्र करावे.
पुढे या मिश्रणात अडीच कप गरम पाणी टाकावे.
कुकर मध्यम आचेवर ठेवून ३ शिट्या होऊन द्यावा.
तीन शिट्या झाल्यानंतर खान्देशी मसाला खिचडी तयार आहे.