Kitchen Hacks : फोडणीसाठी वापरला जाणारा कढीपत्ता अधिक काळ टिकवायचा आहे ? 'या' पध्दतीने साठवा

चटणीपासून ते तडका देणाऱ्या पदार्थात कढीपत्ता हा स्वयंपाकघरात लागतो.
Kitchen Hacks
Kitchen Hacks Saam Tv
Published On

Kitchen Hacks : कढीपत्त्याशिवाय फोडणी अपूर्ण आहे. चटणीपासून ते तडका देणाऱ्या पदार्थात कढीपत्ता हा स्वयंपाकघरात लागतो. कढीपत्त्याचा वापर देशभरात विविध प्रकारचे पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो.

ताज्या कढीपत्त्याच्या चवीमुळे जेवणाची चवही बर्‍याच प्रमाणात वाढते. याच्या अनेक आरोग्यदायी फायद्यांमुळे, लोकांना रोजच्या आहारात याचा समावेश करायला आवडते. कढीपत्त्यात अँटिऑक्सिडंट्स, फायबर, जीवनसत्त्वे (Vitamins) आणि खनिजे असतात जे आपल्या आरोग्यासाठी (Health) खूप चांगले असतात.

Kitchen Hacks
Health Tips : रात्री जेवल्यानंतर पोट दुखीचा त्रास होतोय ? जाणून घ्या, त्याचे योग्य कारण

कढीपत्ता दीर्घकाळ ताजा ठेवण्यासाठी आपण काही सोप्या मार्गांचा अवलंब करू शकता.

१. कढीपत्त्याची पाने धुवून ती चाळणीत ठेवा, सर्व पाणी निघून जाण्यास मदत होईल. पानांना पंखाखाली सुकविण्यासाठी ठेवा, सर्व आर्द्रता शोषून घेईपर्यंत २ ते ३ तास लागतील. यानंतर, ही पाने कापडाने कोरडी करा. आता एका हवाबंद डब्यात काही टिश्यू ठेवा आणि त्यावर पाने ठेवा. बॉक्स झाकून फ्रीजमध्ये ठेवा.

२. कढीपत्ता धुवून हवाबंद डब्यात साठवा. कॅन बंद करण्यापूर्वी पानांवर टॉवेल ठेवा. फ्रीजरमध्ये ठेवल्यास ही पाने महिनाभर टिकतील.

Kitchen Hacks
Onion Storage : कांदा पुन्हा रडवणार ? अधिक काळ टिकवण्यासाठी 'या' टिप्सचा वापर करा

३. तसेच कढीपत्ता एका काचेच्या डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवा. हे शेल्फ लाइफ वाढविण्यास मदत करते. जेव्हा गरज असेल तेव्हा काही पाने काढून धुवा आणि नंतर वापरा.

४. कढीपत्त्याची पाने झिप लॉक बॅगमध्येही ठेवू शकतात. ओलावा शोषण्यासाठी आपण पिशवीच्या आत टिश्यू ठेवू शकता.

५. कढीपत्ता २-३ दिवस सूर्यप्रकाशात ठेवा आणि नंतर हवाबंद डब्यात ठेवल्यासही तो अधिक काळ टिकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com