Kitchen Hacks : फ्रिजमध्ये ठेवलेल्या भाज्या किती दिवस टिकतात? जाणून घ्या साठवण्याची योग्य पद्धत

How to store vegetables in the refrigerator : फ्रिजमध्ये भाज्या साठवताना त्या कुजू नयेत आणि ताजे राहाव्यात म्हणून त्योया योग्य पद्धतीने साठवून ठेवणे महत्वाचे आहे.
How to store vegetables in the refrigerator
How to store vegetables in the refrigeratorsaam tv
Published On: 

घरात आठवडाभर पुरतील इतक्या भाज्या एकाच वेळी खरेदी करून फ्रिजमध्ये ठेवण्याची अनेकांची सवय असते. मात्र, फ्रिजमध्ये ठेवल्याने भाज्या कायम ताज्या राहतात असे नाही. प्रत्येक भाजीची टिकण्याची क्षमता वेगवेगळी असते. तापमान, ओलावा आणि साठवण्याची पद्धत यावरही भाज्यांचा ताजेपणा अवलंबून असतो. त्यामुळे भाज्या खराब होण्यापासून वाचवण्यासाठी त्या योग्य पद्धतीने साठवणे गरजेचे आहे.

पालेभाज्या लवकर होतात खराब

पालक, मेथी, कोथिंबीर यांसारख्या पालेभाज्या लवकर कोमेजतात. त्यामुळे त्या फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी स्वच्छ करून पूर्णपणे वाळवाव्यात. पानांमध्ये ओलावा राहिल्यास त्या लवकर खराब होऊ शकतात. या भाज्या शक्यतो काही दिवसांत वापरून घ्याव्यात. पानांना चिकटपणा आला, दुर्गंधी येऊ लागली किंवा रंग बदलला तर अशा भाज्या खाणे टाळावे.

How to store vegetables in the refrigerator
Kitchen Tips : कापलेला लिंबू वाळू नये म्हणून वापरा या सोप्या ट्रिक्स; रसही राहील अनेक दिवस ताजा

गाजर, फरसबी आणि ढोबळी मिरची कशी ठेवावी?

गाजर, फरसबी आणि ढोबळी मिरची योग्य पद्धतीने ठेवल्यास अनेक दिवस टिकू शकतात. या भाज्या फ्रिजमधील भाजी ठेवण्याच्या कप्प्यात ठेवाव्यात. हवाबंद पॅकिंगऐवजी थोडी हवा खेळती राहील अशा पिशवीचा वापर करावा. तसेच भाज्या कापून ठेवण्यापेक्षा गरजेनुसार ताज्या कापून वापरणे अधिक चांगले.

How to store vegetables in the refrigerator
Digital Trauma : मुलं सतत चिडचिड करतात, रात्री घाबरून उठतात? मोबाईलमुळे होणाऱ्या ‘डिजिटल ट्रॉमा’ची ही लक्षणे दुर्लक्ष नका

बटाटे, कांदे फ्रिजमध्ये ठेवू नका

बटाटे आणि कांदे फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नसते. ते थंड, कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी ठेवावेत. ओलसर जागेत ठेवल्यास त्यांना कोंब फुटू शकतात किंवा ते सडू शकतात. लसूणही कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी ठेवणे योग्य ठरते.

कापलेल्या भाज्यांची घ्या काळजी

  • कापलेल्या भाज्या स्वच्छ आणि झाकण असलेल्या डब्यात ठेवून लवकर वापराव्यात.

  • शिजवलेली भाजी उरल्यास ती खोलीच्या तापमानावर जास्त वेळ ठेवू नये.

  • लवकर थंड करून फ्रिजमध्ये ठेवावी आणि पुन्हा खाताना व्यवस्थित गरम करावी.

  • योग्य साठवणुकीच्या सवयी लावल्यास भाज्यांचा अपव्यय टाळता येतो आणि त्यांचा ताजेपणाही अधिक काळ टिकवता येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.