Money Saving Tips : मुलांनाही द्या बचतीचे धडे ! पॉकेट मनीतून अशाप्रकारे साठवा पैसे

Parenting Tips : योग्य पालकत्वासोबत मुलांचे भविष्य घडवणे हे देखील महत्त्वाचे आहे.
Money Saving Tips
Money Saving Tips Saam Tv
Published On

Saving Tips : मुलांना चांगल्या गोष्टींची सवय लावणे हे पालकांवर आधारित असते. योग्य पालकत्वासोबत मुलांचे भविष्य घडवणे हे देखील महत्त्वाचे आहे. मुलांचे लाड करणे त्यांना योग्य अयोग्याची जाणीव करुन देणे हे देखील अधिक गरजेचे आहे.

हल्लीचे पालक (Parents) मुलांना शाळेत किंवा कॉलेजला जाताना पॉकेट मनी आवर्जून देतात. पण त्यासोबतच मुलांना (Child) योग्य वयात त्याची बचत कशी करावी हे देखील सांगणे गरजेचे आहे. आपण जर त्यांना लहानपणापासूनच बचतीविषयी सल्ला दिला किंवा सांगितले तर नक्कीच ते आयुष्यात गुंतवणूक करण्यावर अधिक भर देतील मुलांना बचत करण्याची सवय लागली तर भविष्यात त्यांना समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. कशी लावला सवय, जाणून घ्या

Money Saving Tips
Brain Foods For Children : मुलांची बुद्धी तल्लख व्हावी, अभ्यासात हुशार व्हावी असं वाटतं? ही ५ पदार्थ खाऊ घाला

1. पैशांचे महत्त्व समजावून सांगा

मुलांना पैशांचे महत्त्व समजावून सांगणे अधिक गरजेचे आहे. तुम्ही जे पैसे कमावता ते भविष्यासाठी आहे व हे पैसे (Money) कमावण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे खर्च करताना हुशारीने करा.

2. गरजेच्या वस्तू खरेदी करा

अनेकवेळा मुलांच्या हट्टीपणामुळे आपण त्यांना हव्या त्या वस्तू घेऊन देतो. परंतु, आपल्याला हे देखील कळायला हवे की, कोणत्या गोष्टींची गरज त्यांना सर्वाधिक आहे. काही वेळेस त्यांच्या हट्टीपणाला दुर्लक्षित देखील करणे गरजेचे आहे. ते शांत झाल्यावर त्यांना त्या बाबतीतचे महत्त्व समजावून सांगा.

Money Saving Tips
White Hair Remedies : आयुष्यात केस कधीच होणार नाहीत पांढरे; फक्त या 3 गोष्टीचा वापर करा

3. पैसे वाचवण्याच्या सवयीला प्रोत्साहन द्या

जवळच्या व्यक्तीने किंवा नातेवाईकांनी पैसे दिल्यानंतर त्यांना साठवणूकीचा पर्याय सांगा. पैसे जोडण्याची सवय त्यांना लावा. तसेच त्यांना पिगी बँक खरेदी करुन द्या. त्याचे महत्त्व देखील सांगा

Money Saving Tips
Namrata Pradhan : मराठ्यांची लेक आहे रूबाब तर असणारच !

4. मुलाच्या पैशाने त्यांना भेटवस्तू द्या

वाढदिवस किंवा सण यांसारख्या विशेष प्रसंगी, तुमच्या मुलांसाठी त्यांनी वाचवलेल्या पैशातून भेटवस्तू खरेदी करा, यामुळे त्यांना बचतीचे महत्त्व समजेल आणि पुढील वेळी चांगली भेटवस्तू मिळवण्यासाठी अधिक पैसे वाचतील.

5. प्राधान्यक्रम

मुलाला सांगा की तुम्हाला जे आवडते ते तुम्ही सर्वकाही विकत घेऊ शकत नाही. परंतु, आवड किंवा गरज याविषयी त्यांना सांगा. त्याचा विशिष्ट असा प्राधान्यक्रम ठरवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com