Kidney Health: डायबेटीज आणि BPमुळे होतं किडनीचं नुकसान? डॉक्टरांनी सांगितलं धोकादायक सत्य

High Blood Pressure: मधुमेह आणि उच्च रक्तदाब एकत्र आल्यास किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. ही धोकादायक तिकडी कशी काम करते, लक्षणं आणि प्रतिबंध उपाय जाणून घ्या.
hypertension complications
Kidney Healthgoogle
Published On

सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये व्यायाम कमी करणं हा बदल झालेला आहे. त्यात लहान मुलं ही बाहेरचे मैदानी खेळ खेळणं टाळतात. मग शरीराची वाढ योग्य होत नाही. पण याचसोबत शरीराला योग्य अन्न किंवा पौष्टीक पदार्थ हवे असतात. ते मिळाले नाही की शरीरामध्ये विविध आजारांची वाढ होते. त्यात मधुमेह (Diabetes), उच्च रक्तदाब ( High Blood Pressure) आणि किडनीचे आजार हे आज अनेकजण वेगवेगळे आजार असल्याचं समजतात. पण प्रत्यक्षात हे तिन्ही आजार एकमेकांशी खूप घट्ट जोडलेले असतात.

एकत्र आल्याने शरीरासाठी गंभीर धोका ठरू शकतात. तुम्हाला यामध्ये कोणतीही लक्षणं जाणवत नाहीत आणि शेवटी रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं. त्याने हृदयविकार, स्ट्रोक किंवा किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे या आजाराचे संबंध समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे.

hypertension complications
High Cholesterol Symptoms: सावधान! थंडीत ही 5 लक्षणे अजिबात दुर्लक्षित करु नका, असू शकतो उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका

डायबेटीज किडनीचं नुकसान कसं करतं?

रक्तातली साखर बरेच दिवस वाढलेली असेल तर रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं. याचा थेट परिणाम किडनीतल्या सूक्ष्म फिल्टर म्हणजे नेफ्रॉन्सवर होतो. याने हळूहळू किडनीची कार्यक्षमता कमी होऊ लागते.

किडनीचं महत्त्वाचं काम बिघडतं?

किडनी रक्तातले विषारी घटक आणि जास्त द्रव बाहेर टाकते. क्रॉनिक किडनी डिसीजमध्ये ही प्रक्रिया योग्यरित्या होत नाही. त्यामुळे संपूर्ण शरीराच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.

उच्च रक्तदाब म्हणजे सायलेंट किलर

उच्च रक्तदाब अनेकदा कोणतीही लक्षणं न देता नुकसान करत राहतो. यामध्ये रक्तवाहिन्या कडक होतात अन् हृदय, मेंदू आणि किडनीवरचा ताण वाढतो. बरेच दिवस BP नियंत्रणात राहत नसेल किडनी कायमची खराब होऊ शकते.

कोणता आजार कोणत्या आजाराला वाढवतो?

मधुमेहामुळे किडनी खराब होते आणि BP वाढतो. वाढलेला BP किडनीचं नुकसान आणखी लवकर करतो. एकदा हे चक्र सुरू झालं की आजार नियंत्रणात आणणं कठीण होतं.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

hypertension complications
Cat Behavior: मांजरी घरासमोर भांडणं करण्यामागचे संकेत काय? उत्तर वाचून बसेल धक्का

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com