Smartphone Tips : आजच्या काळात स्मार्टफोन ही प्रत्येकाची गरज बनली आहे. आज फोन हे केवळ संवादाचे साधन राहिले नसून ते खूप स्मार्ट झाले आहे. त्यामुळे आपण आपले बहुतांश काम स्मार्टफोनच्या (Smartphone) माध्यमातून पूर्ण करतो. त्याच्या अतिवापरामुळे फोनची बॅटरी लवकर संपते.
मात्र, काहीवेळा असे घडते की आपला फोन बराच वेळ चार्ज करुनही तरी तो खूप हळूहळू चार्ज होतो किंवा पूर्ण चार्ज झाल्यानंतरही फोनची बॅटरी लवकर संपते आणि आपल्याला पुन्हा चार्ज करावे लागते.
हे घडते कारण फोनची बॅटरी आता पाहिजे सारखे काम करत नाही. त्यासाठी आपल्या फोनच्या बॅटरीची काळजी कशी घ्याल हे जाणून घेऊया
१. आपला फोन बंद असण्याच्या मार्गावर असताना आपण त्याला चार्जिंगला लावतो. पण, असे करणे चुक असते. फोन पूर्णपणे बंद झाल्यानंतर त्याच्या बॅटरीवर अतिरिक्त ताण पडतो. ज्यामुळे बॅटरी खराब होते.
२. फोनची बॅटरी १५-२० टक्के शिल्लक असेल, तेव्हा आपण तो चार्जिंगला लावायला हवा. आपण फोन चार्जिंगला शंभर टक्के होईपर्यंत ठेवू नका याचीही काळजी घेतली पाहिजे. यामुळे फोनच्या बॅटरीचे तापमान वाढून ती खराब होऊ शकते. आपण फोन ८०-८५ टक्क्यांपर्यंत चार्ज करू शकता.
३. दीर्घकाळ बॅटरीचे आयुष्य टिकवून ठेवण्यासाठी तापमान महत्त्वाची भूमिका बजावते. तुमच्या फोनची बॅटरी जास्त काळ उष्णतेच्या संपर्कात राहिल्यास बॅटरीवर अतिरिक्त ताण पडतो आणि तिच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
४. फोन रात्रभर चार्जिंगवर ठेवू नका, उशीखाली ठेवू नका किंवा उन्हाळ्याच्या दिवसात कारच्या डॅशबोर्डवर प्लग इन करू नका. यामुळे फोन आणि त्याची बॅटरी खराब होईल.
५. अनेकदा लोक फोनचा चार्जर खराब झाल्यानंतर फास्ट चार्जर विकत घेणे पसंत करतात जेणेकरून त्यांचा फोन (Phone) लवकर चार्ज होईल. पण तुमची ही सवय तुमच्या फोनची बॅटरी खराब करेल.
६. आपल्या स्मार्टफोनचा चार्ज वापरण्याचा प्रयत्न करा. इतर दुसऱ्या कोणाचा चार्ज आपल्या फोनला लावू नका.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.