Smartphone tips : तुमचा फोन सतत गरम होतोय ? त्याचे नेमके कारण काय?

आपला फोन सतत गरम का होतो ?
Smartphone overheating problems, Smartphone care tips
Smartphone overheating problems, Smartphone care tipsब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : आजकालच्या काळात स्मार्टफोन हा रोज वापरला जातो. आपण एक सेंकदही त्याच्यापासून दूर राहू शकत नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण आपला पूर्ण वेळ हा आपल्या फोनमध्ये घालवतो.

हे देखील पहा -

बदलेल्या तापमानामुळे आपला स्मार्टफोन गरम होऊ शकतो. वाढत्या तापमानामुळे स्मार्टफोनवर त्याचा परिणाम होऊ लागतो. उष्णतेमुळे आपल्या फोनमधील आतील घटांकावर होतो. परंतु, जर आपण फोनचा योग्य पध्दतीने वापर न केल्यास आपला फोन लवकर गरम होऊन तो खराब होण्याची शक्यता असते. फोन (Phone) अधिक गरम झाल्याने बॅटरी फुटण्याची शक्यता असते. ही समस्या गंभीर असली तरी हा फोन सतत गरम का होतो हे जाणून घेऊया.

१. फोनला सूर्यप्रकाशापासून लांब ठेवा. सूर्यप्रकाशाशी फोनचा थेट संबंध आल्यास किंवा फोन चार्जिंगला लावून तो हाताळल्यास तो गरम होऊन त्याच्या आतील भागांचे नुकसान होऊ शकते.

Smartphone overheating problems, Smartphone care tips
Health tips : या फुलाच्या पाकळ्यांनी होतील अनेक आजार दूर, शेफ संजीव कपूरने सांगितले त्याचे अनोखे फायदे

२. फोन सतत गरम होत असेल तर आपण तो कोणत्या ठिकाणी ठेवतो हे तपासून पहा. फोनला फ्रीज, टिव्ही व इतर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर ठेवा. फोनला थंड (Cold) जागी ठेवण्याचा प्रयत्न करा.

३. एकाच वेळी अनेक फंक्शन सुरु असल्यामुळे ही फोन गरम होतो. त्यासाठी जीपीएस, ब्लुटूथ, वायफाय यांसारखे फंक्शन बंद ठेवा. सतत चालू ठेवल्याने बॅटरीवर दाब येतो व फोन गरम होऊ लागतो.

४. फोनचे अॅप्स वेळोवेळी अपडेट करत रहा. त्यासोबतच फोनचे सॉफ्टवेअर नियमित अपडेट करत रहा त्यामुळे फोन अधिक काळ चालेल.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com