Health tips : या फुलाच्या पाकळ्यांनी होतील अनेक आजार दूर, शेफ संजीव कपूरने सांगितले त्याचे अनोखे फायदे

आरोग्यासाठी गुलाबाचा वापर कसा होतो जाणून घ्या.
Rose petals benefits, Health tips, benefits of rose
Rose petals benefits, Health tips, benefits of roseब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : गुलाब हे फूल सगळ्यात जास्त आवडणारे आहे. अनेक प्रेमीयुगल जोडप्यांची ती निशाणी म्हणून ओळखली जाते. याचा वापर आयुर्वेदात वेगवेगळ्या प्रकारे केला जातो.

हे देखील पहा -

असे म्हटले जाते गुलाब हे अनेक आजारांसाठी फायदेशीर आहे. गुलांबाच्या पाकळ्यांचा वापर हा चहा, विविध पदार्थ, मिठाई किंवा अनेक औषधे बनवण्यासाठी केला जातो. देशातील प्रसिद्ध शेफ संजीव कपूर गुलाबाच्या पाकळ्यांना आरोग्याचा खजिना मानतात. त्यानी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एका पोस्टद्वारे सांगितले आहे की, प्रेमाच्या प्रतीकाव्यतिरिक्त गुलाब आरोग्यासाठी कसा फायदेशीर आहे हे त्यांनी सांगितले आहे. गुलाब वजन कमी करण्यास मदत करतात असे ही त्यांनी सांगितले. मूळव्याध, चिंता आणि तणाव यासारख्या गंभीर आरोग्यांच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या उपयुक्त ठरू शकतात ते कसे जाणून घेऊया.

१. गुलाबाच्या पाकळ्या वाईट आणि रक्तरंजित अशा दोन्ही प्रकारच्या मूळव्याधांच्या लक्षणांशी लढण्यास मदत करतात. हे पचन सुधारून आतड्याची हालचाल वाढवू शकते. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये सौम्य रेचक प्रभाव असतो ज्यामुळे पचन सुधारते आणि त्याचे कार्य सुधारते.

२. गुलाबाचा चहा हर्बल आहे व पचनसंस्था सुधारण्यासाठी तो ओळखला जातो. वजन कमी करण्यासाठी निरोगी पचनसंस्था म्हणून एक किंवा दोन कप रोझ चहा प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

३. गुलाबाच्या पाकळ्या चिंता (Stress) आणि तणाव कमी करण्यास मदत करतात. तणाव कमी करून झोपेला चालना देण्यास मदत करते. त्यात चिंता कमी करणारे एलथेनाइन असते. त्यासाठी गुलाबाचा चहा फायदेशीर आहे.

४. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्सचे गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात असे मानले जाते. अँटिऑक्सिडंट्स हानिकारक मुक्त रॅडिकल्सपासून बचाव करण्यास आणि शरीरातील सेल्युलर आरोग्यास प्रोत्साहन देण्यास मदत करतात. तसेच याचा अर्क देखील जळजळ कमी करण्यात मदत करते. गुलाबामध्ये व्हिटॅमिन (Vitamins) सी भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी चे अनेक आरोग्य फायदे आहेत.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com