Kashmiri Kahwa: फेमस आणि काश्मिरी स्पेशल कहवा चहा; कसा बनवतात? रेसिपी पाहा

Kashmiri Kahwa Recipe : काश्मिर फिरण्यासाठी गेल्यावर कहवा प्यायले असाल. मात्र अनेक व्यक्तींना कहवा काय आहे हे माहिती नाही. त्यामुळे त्या बद्दल अधिक माहिती जाणून घेत त्याची रेसिपी देखील पाहू.
Saam TV
Kashmiri KahwaKashmiri Kahwa Recipe

भारतात आल्यावर काश्मिर फिरण्यासाठी गेलेला प्रत्येक व्यक्ती कहवा प्यायल्याशिवाय घरी येत नाही. काश्मिमध्ये कहवा फार फेमस आहे. तुम्ही देखील काश्मिर फिरण्यासाठी गेल्यावर कहवा प्यायले असाल. मात्र अनेक व्यक्तींना कहवा काय आहे हे माहिती नाही. त्यामुळे त्या बद्दल अधिक माहिती जाणून घेत त्याची रेसिपी देखील पाहू.

Saam TV
Tea After Lunch: तुम्हालाही जेवणानंतर चहा पिण्याची सवय आहे? मग हे वाचाच

काश्मिरचा कहवा म्हणजे एकप्रकारचा स्पेशल चहा आहे. या तब्बल ११ गोष्टी टाकल्या जातात. ११ विविध मसाल्याच्या वस्तूंपासून हा चहा बनतो.

साहित्य

काश्मिरी ग्रीन टी

बादामाचे काप

लवंग

दालचिनी

सुंठ

काळी मिरी

हिरवी वेलची

बडिशेप

सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या

केसर

कृती

कहवा वनवण्यासाठी आधी किती व्यक्तींसाठी बनवायचे आहे त्या मोजून घ्या. त्यानुसार टोपात पाणी ठेवा. पाण्यामध्ये आधी काश्मिरी ग्रीन टी मिक्स करा. याला उकळी येण्याआधी बादामाचे काप, लवंग, दालचिनी आणि सुंठ बारीक करून मिक्स करा.

त्यानंतर यामध्ये काळी मिरी, हिरवी वेलची, बडिशेप हे बारीक न करात अॅड करा. पुढे कहवामध्ये उकळी आल्यावर सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आणि केसर टाका. तयार झाला तुमचा कहवा.

कहवा पिण्याचे फायदे

काश्मिरमधील व्यक्ती सांगतात की कहवा चहा आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. माणूस जास्त आजारी पडत नाही. त्यासह व्हायरल इंफेक्शनमध्ये सर्दी आणि खोकल्या सारख्या समस्यांपासून आपण दूर राहतो.

Saam TV
Green Tea Che Fayde: डाएटमध्ये ग्रीन टी घेताय? उन्हाळ्यात ग्रीन टी पिणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com