Kartik Maas 2025: आजपासून कार्तिक महिना सुरु, घरात ही ५ महत्वाची कामे करा धन-समृद्धी अन् शांती यईल

Kartik Maas 2025 Rituals : कार्तिक महिना ७ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. भगवान विष्णू आणि तुळशीची पूजा, पवित्र स्नान, दानधर्म आणि दिवा लावल्याने घरात सुख, शांती आणि धनसमृद्धी येते.
Kartik Maas 2025
Kartik Maas 2025Saam Tv
Published On

हिंदू धर्मात कार्तिक महिन्याला विशेष महत्व आहे. या महिन्यात भगवान विष्णूची पूजा केली जाते. कार्तिक पूजेत तुळशीला विशेष महत्व आहे. या महिन्यात सूर्योदयापूर्वी उठून तुळशीची पूजा करणे शुभ मानले जाते. तुळशीसमोर दिवा लावल्याने आशीर्वाद मिळतो. कार्तिक महिन्यात जप, तप आणि प्रार्थना केल्याने भगवान विष्णूच नव्हे तर देवी लक्ष्मीचाही आशीर्वाद प्राप्त होतो.

Kartik Maas 2025
Hair Dye Kidney Failure Risk: सौंदर्याच्या नादात 20 वर्षीय तरूणीचं आरोग्य धोक्यात, हेअर डायमुळे किडनीवर परिणाम

आज ७ ऑक्टोबरपासून कार्तिक महिन्याला सुरूवात झाली आहे. कार्तिक महिन्याच्या स्नान विधीला सुरूवात झाली आहे. कार्तिक महिन्याचा शेवट ५ नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेला होईल. दरम्यान १ ऑक्टोबर रोजी भगवान विष्णू देवथुनी एकादशीच्या दिवशी योगिक झोपेतून जागे होतात यानुसार कार्तिक महिन्यात काय करावे हे जाणून घ्या.

१) कार्तिक महिन्याला स्नान करण्याला विशेष महत्व आहे. ब्रह्मोदयापूर्वी स्नान केल्याने फायदा होतो.

2) कार्तिक महिन्यात गहू, हरभरा, दूध, दही आणि तूप इत्यादींपासून बनवलेल्या वस्तू दिवसातून एकदा सेवन करतो, त्याचे सर्व पाप दूर होतात.

Kartik Maas 2025
Tuesday Horoscope: पैसा, प्रेम सारं मिळणार, तुमच्या नशिबी काय? वाचा मंगळवारचे राशीभविष्य

3) कार्तिक महिन्यात स्नान करण्यासाठी, पवित्र ठिकाणी स्नान करणे सर्वात शुभ मानले जाते किंवा तुम्ही स्वच्छ तलाव, विहीर इत्यादींमधून पाणी घेऊन देखील स्नान करू शकता.

४) कार्तिक महिन्यात, जे लोक सकाळी लवकर उठतात, पवित्र स्नान करतात, भक्तिगीते गातात आणि संपूर्ण महिनाभर सात्विक अन्न खातात त्यांना देवाचा आशीर्वाद मिळतो. या महिन्यात मांस आणि मद्यपान देखील टाळावे.

5) कार्तिक महिन्यात पिंपळाच्या झाडाभोवती, तुळशीच्या झाडाभोवती आणि इतर पवित्र झाडांभोवती दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. कार्तिक महिन्यात तुळशीच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. म्हणून, संपूर्ण महिन्यात दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुळशीच्या झाडाभोवती तुपाचा दिवा लावावा.

Kartik Maas 2025
Diwali Rangoli : छापा - ठिपक्यांची नाही, यंदा घरासमोर काढा 'मोराची' सुंदर रांगोळी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com