Shreya Maskar
दिवाळीत घरासमोर आवर्जून रांगोळी काढा आणि अंगण सजवा.
रोजची ठिपक्यांची रांगोळी काढून कंटाळा आला असेल तर यंदा मोराच्या डिझाइनची रांगोळी काढा.
आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या मोराच्या डिझायन शिकू शकता.
फांद्यांवर बसलेला मोर, पिसारा फुललेला मोर या सध्या ट्रेंडिंग डिझायन आहेत.
मोराची रांगोळी काढण्यासाठी बांगड्या, चमचे, ताट-वाटी यांची मदत घ्या.
मोराच्या रांगोळी भोवती सुंदर दिवे लावा आणि घर प्रकाशाने उजळवा.
तुम्ही संस्कार भारती रांगोळीच्या डिझायनमध्ये सुंदर मोराची रांगोळी काढू शकता. रांगोळीत फुले देखील भरा.
तुम्हाला घरासमोर मोराची रांगोळी हवी असेल, पण ती काढता येत नसेल तर बाजारातून रांगोळीचे सुंदर छाप तुम्हाला सहज मिळतील.