Shreya Maskar
1 दिवसांत साफसफाई करायची असेल तर सर्वप्रथम पडदे, उशीचे कव्हर स्वच्छ धुवून ठेवून द्या.
कपाट आणि ड्रॉवर स्वच्छ करण्यासाठी लिक्विड सोपचा वापर करा.
शो पीस असलेल्या कपाटाची धूळ काढण्यासाठी ओल्या कापडाचा वापर करा.
घरातील खिडक्या आणि दरवाजे स्वच्छ करण्यासाठी क्लीनर लिक्विडचा वापर करा.
काचेवरून ओला कपडा फिरवून झाल्यावर आवर्जून सुका कपडा फिरवा, नाहीतर पांढरे डाग पडतील.
साफसफाईमध्ये बाथरूम आणि टॉयलेट क्लीनिंग सर्वात शेवटी करा.
साफसफाई करताना नको असलेल्या वस्तू ठेवून न देता फेकून द्या. घरातील उपयोगात नसलेल्या वस्तू काढून टाका.
स्वयंपाकघर स्वच्छ करताना डबे, भांडी, फ्रिज चांगली व्यवस्थित स्वच्छ करा.