Shreya Maskar
रात्री केस घट्ट बांधल्यास मुळांना ताण येतो आणि केस गळू लागतात.
ओले केस बांधून झोपू नये. कारण यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
केस पूर्णपणे मोकळे सोडल्यास ते चेहऱ्यावर येतात. ज्यामुळे झोपायला त्रास होतो. तसेच केसांचा गुंता वाढतो.
रात्री झोपताना केसांची सैलसर वेणी घालून ठेवा.
वेणी घालून झोपल्यामुळे केस तुटत नाही. तसेच केसात गुंता राहत नाही.
तुम्हाला वेणी घालायची नसेल तर केसांची सैल पोनीटेल बांधा.
झोपण्यापूर्वी केस सौम्य ब्रशने मोकळे करून विंचरा. जेणेकरून गुंता होणार नाही.
केस मोकळे आणि घट्ट बांधून ठेवण्यापेक्षा त्यांची हलकी वेणी घालणे उत्तम ठरेल.