Somwar Upay: नोकरीतील समस्या चुटकीसरशी होतील दूर; फक्त श्रावणापूर्वी भगवान शंकराचे करा हे उपाय

Remedy for job problems : भगवान शिव हे अत्यंत दयाळू देवता आहेत. त्यांची पूजा केल्याने सर्व संकटं आणि अडचणी दूर होतात. जर तुम्हाला नोकरीमध्ये समस्या येत असतील तर श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी काही सोपे उपाय केल्यास तुमच्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात.
Lord Shiva
Lord Shivasaam tv
Published On

प्रत्येक दिवस हा हिंदू धर्मामध्ये कोणत्या ना कोणत्या व्यक्तीला अर्पण केलेला असतो. असंच यावेळी सोमवारचा दिवस भगवान शंकर अर्थात भोलेनाथांना अर्पण मानला जातो. या दिवशी जर भक्तिने आणि श्रद्धेने महादेवांची पूजा केली, तर ते आपल्या भक्तांचे दुःख दूर करतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात, अशी दृढ श्रद्धा आहे.

मात्र केवळ पूजा नाही तर काही खास उपाय सोमवारच्या दिवशी केल्यास देव तात्काळ प्रसन्न होतात. त्याचप्रमाणे आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात. सोमवारच्या दिवशी कोणते उपाय तुमच्या फायद्याचे ठरणार आहेत ते पाहूयात.

आर्थिक तंगी

जर तुमच्यावर आर्थिक संकट असेल आणि त्यातून मार्ग निघत नसेल तर सोमवारच्या दिवशी संध्याकाळी जवळच्या शिवमंदिरात जा आणि शिवलिंगासमोर तूपाचा दिवा प्रज्वलित करा. याच वेळी “ॐ नमः शिवाय” हा मंत्र जप करत आर्थिक समृद्धीची प्रार्थना करा. असा उपाय केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि पैशांची चणचण दूर करण्यास मदत करतात.

मानसिक शांती

सोमवारच्या दिवशी उपवास ठेवणं आणि मनापासून भगवान शंकराची पूजा करणं, हे तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. शिवलिंगावर गंगाजल किंवा स्वच्छ पाणी वाहावं. त्यामुळे घरात समाधान आणि शांती नांदते. घरातील तणाव कमी होतो आणि मन स्थिर राहतं.

Lord Shiva
Shukra Gochar: 12 महिन्यांनी चंद्राच्या राशीत शुक्राचं गोचर; 3 राशी होणार मालामाल, करियरमध्येही मिळणार उंची

नोकरीतील समस्या

जर तुम्हाला नोकरीत अडचणी येत असतील किंवा कामात यश मिळत नसेल, तर सोमवारी शिवलिंगावर मध अर्पण करा. मध अर्पण केल्याने व्यवसायात किंवा नोकरीत वाढ होते. त्याचप्रमाणे नवीन संधी मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. महादेवाचे हे स्वरूप अडथळे दूर करून मार्ग सुकर करतं.

Lord Shiva
Shukrawar Upay: घरातून नकारात्मकता होईल दूर; शुक्रवारच्या दिवशी करा हे सोपे उपाय

घरातील समस्या दूर कसे कराल?

जर तुमच्या घरात वारंवार भांडणं होत असतील तर सोमवारच्या दिवशी महादेवाला बेलपत्र अर्पण करा. त्याच दिवशी एखाद्या गरीब किंवा गरजवंत व्यक्तीला तांदूळ दान करावा. असं केल्याने घरात शांतता येते आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होतो.

Lord Shiva
Sunday Remedies : रविवारच्या दिवशी अडकलेली कामं लगेच होतील; फक्त करावे लागणार हे सोपे उपाय

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com