जिओ ग्राहकांना मोठा झटका; 'हा' प्रीपेड प्लॅन केला दीडशे रुपयांनी महाग

जिओ ग्राहकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. रिलायन्सच्या जिओ ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. जिओने एक प्रीपेड प्लॅन बंद केला आहे.
Jio recharge
Jio recharge Saam Tv

नवी दिल्ली : जिओ (Jio) ग्राहकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. रिलायन्सच्या (Reliance) जिओ ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. जिओने एक प्रीपेड प्लॅन बंद केला आहे. जिओच्या या निर्णयामुळे जिओ ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. ( jio prepaid plans Latest News In Marathi )

Jio recharge
स्वस्त आणि मस्त; बीएसएनएल कंपनीचा १९ रुपयांचा बेस्ट प्लॅन, पाहा डिटेल्स

जिओने ७४९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन बंद केला आहे. त्यामुळे त्या प्रीपेड प्लॅनच्या (Prepaid Plan) बदल्यात ८९९ रुपये मोजावे लागणार आहे. हा निर्णय जिओ ग्राहकांना मोठा झटका मानला जात आहे. कारण या निर्णयामुळे जिओ ग्राहकांना त्या प्रीपेड प्लॅनसाठी १५० रुपये अधिक मोजावे लागणार आहे.

Jio recharge
ऑफिसमधील सहकाऱ्याला डेट करत असाल तर, या 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा!

टेलिकॉमटॉकच्या माहितीनुसार, जिओ हे ग्राहकांना ७४९ रुपये आणि ८९९ रुपयांचा दोन्ही प्लॅन ऑफर करत होते. या दोन्ही प्लॅनमध्ये एकसारखे प्लॅन होते. मात्र, जिओने ७४९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना ८९९ रुपयांचा प्लॅन विकत घ्यावा लागणार आहे. जिओ कंपनीने या प्रीपेडबद्दल अधिकृत माहिती त्यांच्या वेबसाईटवर दिली आहे. एकंदरीत जिओ कंपनीच्या निर्णयामुळे ग्राहकांना त्या प्रीपेड प्लॅनसाठी १५० रुपये अधिक मोजावे लागणार आहे.

या प्लॅनमध्ये जिओ ग्राहकांना २८ दिवसांमध्ये दर दिवशी २ जीबी हाय-स्पीड डेटा मिळणार आहे. हाय-स्पीड संपल्यानंतर ग्राहकांना हाय-स्पीड ६४ केबीपीएस मिळणार आहे. या प्लॅनमुळे एकूण वैधता ३३६ दिवसांची आहे. तसेच ग्राहकांना अनलिमिटेड कॉलची देखील सुविधा मिळते. तसेच ग्राहकांना जिओचे काही अॅप्स देखील सब्सक्रिप्शन करण्यास मिळणार आहे. या प्लॅनमध्ये दरदिवशी पन्नास एसएमएस आणि दोन जीबी इंटरनेट मिळणार आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com