गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर देशातील ८ शहारांमध्ये Jio Air Fiber लॉन्च केले आहे. जिओ एअर फायबरने एंड- टू - एंड सोल्यूशन आहे. जे होम एंटरटेनमेंट, स्मार्ट होम सर्व्हिस आणि हाय स्पीड ब्रॉडबँड यांसारख्या सुविधा आपल्याला मिळणार आहे.
कंपनीने जिओ एअर फायबरची सुविधा दिल्ली, मुंबई, हैदराबाद, कोलकाता, अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई आणि पुणे या ८ मेट्रो शहरांमध्ये केली आहे. जिओ कंपनीने एअर फायबर आणि एअर फायबर मॅक्स नावाचे दोन प्लान नवे प्लान आणले आहेत. यातील एअर फायबर प्लानमध्ये ग्राहकाला दोन प्रकारचे स्पीड प्लान मिळतील ज्यामध्ये 30Mbps आणि 100Mbps असेल. तसेच या प्लानच्या सुरुवातीची किंमत ही ५९९ रुपये इतकी असेल.
यामध्ये 30Mbps मध्ये ५९९ रुपये तर 100Mbps मध्ये ८९९ रुपये किंमत ठेवण्यात आली आहे. दोन्ही प्लानमध्ये ग्राहकांना 550 हून अधिक चॅनेल्स आणि 14 अॅप्सचे Subscription मिळतील.
एअर फायबरच्या (Air Fiber) प्लानमध्ये कंपनीने १०० एमबीपीएस स्पीडसह १९९९ रुपयांचा देखील प्लान सादर केला आहे. ज्यामध्ये चॅनेल्स, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन आणि जिओ सिनेमाचे Subscription मिळेल.
1. AirFiber Max योजनेची किंमत:
ज्या ग्राहकांना अधिक जास्त इंटरनेट स्पीड हवा असेल त्यांनी 'AirFiber Max' चा प्लान निवडावा. जिओने बाजारात 300 Mbps ते 1000 Mbps, 1Gbps पर्यंतचे तीन दमदार प्लान लॉन्च (Launch) केले आहेत. यामध्ये तुम्हाला 1499 रुपयांमध्ये 300 Mbps स्पीड मिळेल. 500 Mbps पर्यंतचा स्पीड 2499 रुपयांना मिळेल आणि जर युजर्सला 1Gbps स्पीडचा प्लान घ्यायचा असेल तर त्याला 3999 रुपये खर्च करावे लागतील.
१५ लाख किलोमीटरहून संपूर्ण भारतात (India) जिओची ही योजना अधिक जास्त पसरलेली आहे. कंपनीने आतापर्यंत १ कोटीपेक्षा जास्त परिसर जिओ फायबरच्या माध्यमातून जोडले गेले आहे. जर तुम्हाला जिओचा एअर फायबर विकत घ्यायचा असेल तर ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने तो बुक केला जाऊ शकतो. यासाठी तुम्ही जिओच्या साइट्सला भेट देऊ शकता किंवा स्टोअरमध्ये जाऊन खरेदी करु शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.